पिंपरी : पिंपरी मधील दैनिक पुढारीचे पत्रकार मिलिंद कांबळे यांना अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेतर्फे ‘उत्कृष्ट पत्रकार’ म्हणून गुरुवारी गौरविण्यात आले.
पत्रकारदिनाच्या निमित्ताने महापालिकेच्या मुख्यालयात अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात कांबळे यांना महापौर माई ढोरे, आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते आणि, सभागृहनेता नामदेव ढाके, स्थायीसमिती सभापती अॅड. नितीन लांडगे यांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले. मिलिंद कांबळे यांचा परिचय माधुरी कोराड यांनी करून दिला. पत्रकार परिषदेचे विभागीय संघटक बापू गोरे यांनी प्रास्ताविक केले. दादा आढाव यांनी सूत्रसंचालन केले. आभार प्रदर्शन सूरज साळवे यांनी केले.
मिलिंद कांबळे यांचा सन्मान
Reviewed by ANN news network
on
१/०६/२०२२ ११:०४:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: