पिंपरी : कोरोना कालावधीमध्ये मृत्यू झालेल्या पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचा-यांच्या वारसांना सोमवारी प्रत्येकी २५ लाख रुपयांच्या धनादेशांचे वाटप महापौर माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले. एकंदर २६ कर्मचा-यांच्या वारसांना हे धनादेश देण्यात आले.एकंदर ६ कोटी ५० लाख रुपयांचे वाटप यावेळी
करण्यात आले. यावेळी ‘ब’ प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, उप आयुक्त चंद्रकांत इंदलकर, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे
उपस्थित होते.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचा-यांच्या वारसांना धनादेश वाटप
Reviewed by ANN news network
on
१/१७/२०२२ १०:३७:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: