भोसरी बीआरटी टर्मिनल मधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना करा : नितीन लांडगे

पिंपरी : भोसरी बीआरटी टर्मिनल येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना करा, अशी सूचना स्थायीसमिती सभापती नितीन लांडगे यांनी महापालिका प्रशासनाला केली आहे. याबाबत त्यांनी आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, भोसरीतील बीआरटी टर्मिनलमध्ये सध्या गर्दी होत आहे.त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. या ठिकाणी राजगुरुनगर, मंचरकडे जाणा-या बस उभ्या असतात. तसेच पुण्याकडे जाणा-या बसचा थांबा देखील येथेच आहे. त्यामुळे प्रवाशांची येथे सतत ये जा असते. या भागात रिक्षा तसेच छोटे किरकोळ विक्रेते देखील उभी असल्याने वाहतुकीत भर पडते. यामुळे वाहतूक कोंडीचा सामना प्रत्येकालाच करावा लागत आहे, त्यामुळे ही समस्या लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना कराव्या.
भोसरी बीआरटी टर्मिनल मधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना करा : नितीन लांडगे भोसरी बीआरटी टर्मिनल मधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना करा : नितीन लांडगे Reviewed by ANN news network on १/१२/२०२२ ११:१९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".