पिंपरी : महान्यूज यूट्यूब चॅनेलच्या संपादिका माधुरी कोराड यांना नुकतेचपत्रकार भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमात महात्मा ज्योतिबा फुले मंडळाच्यावतीने शिर्डी संस्थानच्या सीईओ भाग्यश्री बानायत, खासदार श्रीरंग बारणे व पिंपरी चिंचवडचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. महात्मा ज्योतिबा फुले मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या महिलांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येतो. तळागाळातील शोषित,पीडित लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम त्या करत असतात.
माधुरी कोराड यांना पुरस्कार
Reviewed by ANN news network
on
१/०६/२०२२ १०:५१:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: