कोरोना कॉलसेंटरवरून राजकारण; प्रशासनाला पेचात पकडण्याचा प्रयत्न?

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांना दिवसातून एकदा कॉल करून त्यांच्या प्रकृतीची माहिती महापालिकेकडून घेतली जात असून या कामाचा ठेका घेतलेल्या कंपनीचे कॉलसेंटर मुंबईत असल्याने या विषयावरून वाद उपस्थित करून त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे वृत्त आहे. महापालिकेच्यावतीने अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी ‘कॉल सेंटर चालविणा-या संस्थेचे काम मुंबईतून चालते.परंतु गृहविलगीकरणात उपचार घेणा-या रूग्णांना फोन केला जातो. कोणत्या रूग्णला फोन करण्यात आला. त्या रूग्णाला कोणती लक्षणे आहेत, किती वाजता कॉल करण्यात आला. तसेच कोणत्या डॉक्टरने रुग्णाशी संवाद साधला याची संपूर्ण माहिती महापालिका प्रशासनाकडे आहे.’ असे सांगून पालिका प्रशासनाची बाजू स्पष्ट केली आहे. कॉलसेंटरच्या मुद्द्यावरून प्रशासनाला अडचणीत आणून राजकीय वाद रंगविण्याचा प्रयत्न केले जात असल्याचे समजते. मागील कोरोना लाटेच्यावेळीही हे कॉलसेंटर मुंबईमधूनच कार्यरत होते. त्यावेळी आताच्या तुलनेत गंभीर परिस्थिती असतानाही कॉलसेंटर शहराबाहेर असल्याचा साक्षात्कार आता हा मुद्दा उचलणा-यांना झाला नव्हता. तो अचानक होण्यामागे असे कोणते ‘अर्थपूर्ण’ कारण आताच निर्माण झाले आहे असा प्रश्नही यामुळे निर्माण झाला आहे.
कोरोना कॉलसेंटरवरून राजकारण; प्रशासनाला पेचात पकडण्याचा प्रयत्न? कोरोना कॉलसेंटरवरून राजकारण;  प्रशासनाला पेचात पकडण्याचा प्रयत्न? Reviewed by ANN news network on १/२९/२०२२ १०:३०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".