पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीचा प्रारूप आराखडा ‘सोमवार दि. १ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यावर १ ते १४ फेब्रुवारी दरम्यान हरकती, सूचना मागविल्या जाणार आहेत.
सर्वसाधारणपणे महापालिका निवडणुकीसाठी प्रभागरचना आणि आरक्षण सोडत एकाचदिवशी जाहीर केली जाते. परंतु, ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात असल्यामुळे निवडणूक प्रक्रिया थंडावली होती.
ओबीसींच्या आरक्षणाच्या प्रश्नामुळे राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना अगोदर जाहीर करण्याचा निर्णय घेतला असून आरक्षण सोडत नंतर काढली जाणार आहे.
निवडणूक प्रभागांच्या सीमा दर्शवणारी प्रारूप अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे व त्यास प्रसिद्धी देणे १ फेब्रुवारी २०२२, प्रारुप अधिसूचनेवर हरकती व सूचना मागण्याचा कालावधी १ ते १४ फेब्रुवारी २०२२ , प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांचे विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगास सादर करणे १६ फेब्रुवारी , राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिका-यांमार्फत हरकती व सूचना यावर सुनावणी घेण्याचा दिनांक २६ फेब्रुवारी, सुनावणीनंतर प्राधिकृत अधिका-यांनी केलेल्या शिफारशी विहित नमुन्यात नमूद करून विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगास पाठवण्याचा दिनांक २ मार्च २०२२ असा आराखडा प्रसिद्धीचा कार्यक्रम राहणार आहे.
आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी हा कार्यक्रम महापालिकेला पाठविला आहे.
३ सदस्यांचे ४५ तर ४ सदस्यांचा
१ प्रभाग असणार!
शहराची लोकसंख्या १७ लाख २७ हजार ६९२ आहे. त्यात अनुसूचित जातींची २ लाख ७३ हजार ८१० आणि अनुसूचित जमातींची ३६ हजार ५३५ लोकसंख्या आहे. नगरसेवकांची संख्या १३९ आहे. १३९ नगरसेवकांपैकी ६९ पुरुष तर ७० महिला नगरसेविका अशी वर्गवारी असणार आहे. ११४ जागा खुल्या प्रवर्गासाठी असतील. त्यातील ५७ जागा महिलांसाठी राखीव असतील. अनुसूचित जातींसाठी २२ जागा राखीव असून त्यातील ११ महिलांसाठी आणि ११ पुरुषांसाठी असणार आहेत. २ महिला आणि १ पुरुषाकरिता अशा ३ जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव असणार आहेत. निवडणुकीत एकूण ४६ प्रभाग असणार आहेत. त्यात ३ सदस्यांचे ४५ आणि ४ सदस्यांचा १ प्रभाग असणार आहे.
महापालिका निवडणुकीचा प्रारूप आराखडा १ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध होणार
Reviewed by ANN news network
on
१/२९/२०२२ १०:२४:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: