तळेगाव : तळेगाव दाभाडे शहरात आल्टीनो कॉलनी येथे नव्याने उभारलेल्या सरसेनापती उमाबाई दाभाडे उद्यानामध्ये प्रथमच फुलराणी मिनी ट्रेनचा लोकार्पण सोहळा नुकताच आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून पार पडला.
लहान मुलांच्या आकर्षणाची बाब असलेल्या ‘फुलराणी’ मिनी ट्रेनचा लोकार्पण समारंभ सोमवारी पार पडला. यावेळी आमदार सुनिल शेळके, श्रीमंत उमाराजे दाभाडे, श्रीमंत अंजलीराजे दाभाडे, श्रीमंत सत्येंद्रराजे दाभाडे, श्रीमंत याज्ञसेनीराजे दाभाडे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्ष सुशील सैंदाणे, नगरसेवक गणेश खांडगे, नगरसेविका हेमलता खळदे, माजी नगरसेवक चंद्रभान खळदे, माजी नगराध्यक्षा अॅड.रंजना भोसले, उद्योजक दिनेश शहा, दिलीप शहा व इतर मान्यवर उपस्थित होते.
साधारणत: १ एकर जागेत तळेगाव शहरात लहान मुलांना खेळण्यासाठी व मनोरंजनासाठी हे उद्यान उभारण्यात आले आहे. या उद्यानात नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी गार्डन,लहान मुलांसाठी विविध खेळणी, वॉकिंग ट्रॅकही मिनी ट्रेन उपलब्ध करून दिली आहे. मावळात प्रथमच तळेगाव शहरातील उद्यानात ही मिनी ट्रेन सुरु करण्यात आल्याने लहान मुलांमध्ये या फुलराणी ट्रेनचे मोठे आकर्षण निर्माण झाले आहे. आता पर्यंत या उद्यानासाठी ८० लाख रुपयांचा खर्च तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून करण्यात आला असून पुढील टप्प्यात उद्यानातील उर्वरित कामे करण्यात येणार आहेत.
तळेगावातील फुलराणीचे उद्घाटन
Reviewed by ANN news network
on
१/०५/२०२२ ०९:५४:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: