तळेगावात गॅस्ट्रोची साथ; काळजी घेेण्याचे नगरपरिषदेचे आवाहन

 तळेगाव दाभाडे :  तळेगाव दाभाडे शहरातील गावभागात गॅस्ट्रो अजाराचे रुग्ण आढळून आले असून,नागरिकांनपाणी निर्जंतुक करून, गाळून, उकळून पिण्यास वापरावे असे आवाहन तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभाग प्रमुख रश्मी ठाकरे यांनी  नागरिकांना केले आहे.          सध्या तळेगाव शहरात गावभागातील नागरिकांना जुलाब, उलट्या, पोटदुखीसारख्या आजाराचा त्रास होत आहे.याबाबत नागरिकांनी नगरपरिषदेकडे तक्रारी केलेल्या आहेत.नगरपरिषदेकडून गावातील पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले त्यामध्ये काही भागातील पाण्याचे रिपोर्ट व्यवस्थित आले आहेत. यामध्ये संशयास्पद पाण्याचे नमुने घेऊन त्या बाबत शोध मोहीम नगर परिषदेकडून चालू आहे.तरीही नागरिकांनी पिण्यापूर्वी पाणी निर्जंतुकीकरण करून, गाळून, उकळून पिण्यास वापरावे असे आवाहन करण्यात आले आहे.  
तळेगावात गॅस्ट्रोची साथ; काळजी घेेण्याचे नगरपरिषदेचे आवाहन तळेगावात गॅस्ट्रोची साथ; काळजी घेेण्याचे नगरपरिषदेचे आवाहन Reviewed by ANN news network on १/०३/२०२२ ११:००:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".