ओमिक्रॉन, कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करा; संजोग वाघेरे यांची आयुक्तांना सूचना

पिंपरी  : कोरोनाच्या नवीन ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण, तसेच कोरोनाचे रुग्ण देखील पिंपरी चिंचवड शहरामध्ये आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका आणि वैद्यकीय यंत्रणेने आवश्यक उपाययोजना कराव्यात. नागरिकांची गैरसोय होणार नाही. त्यांना आवश्यक वैद्यकीय सुविधा मिळतील, याचे नियोजन करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केली आहे. या संदर्भात वाघेरे पाटील आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेनंतर आता ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून येत आहेत.याबरोबर कोरोना रुग्णसंख्या देखील वाढत आहे. कोरोनाची  तिसरी लाट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर शासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्या प्रमाणे पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात देखील प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात.  कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत रुग्णांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. रेमडेसिवीर इन्जेक्शने, औषधे, ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. खासगी रुग्णालयात भरमसाठ बिले आकारून रुग्णांची लूट झाली. ही परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून महापालिकेने खबरदारी घेणे अपेक्षित आहे. वैद्यकीय विभागाची यंत्रण सज्ज ठेवण्यात यावी. नवीन भोसरी रुग्णालयाप्रमाणे जिजामाता, थेरगाव, आकुर्डी आणि तालेरा ही नवीन रुग्णालये कार्यन्वित झाली आहेत. या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लॅन्ट उभारण्यात आलेले आहेत. या ठिकाणी रुग्णांना सर्व प्रकारच्या सुविधा मिळतील. याचे तातडीने नियोजन महापालिका वैद्यकीय विभागामार्फत करण्यात यावे. नागरिकांच्या कोरोना संबंधित चाचण्या, तसेच गृहविलगीकरण अथवा उपचाराच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्यासाठी महापालिकेने उपाययोजना कराव्यात. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर, गर्दीवर निर्बंधाचे पालन होईल याची दक्षता घेण्यात यावी. औषधे, ऑक्सिजनचा साठा मुबलक ठेवावा. अनेकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला नाही. त्यांचे घरोघरी जाऊन लसीकरण पूर्ण करावे, असे वाघेरे यांनी म्हटले आहे.
ओमिक्रॉन, कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करा; संजोग वाघेरे यांची आयुक्तांना सूचना ओमिक्रॉन, कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करा;   संजोग वाघेरे यांची आयुक्तांना सूचना Reviewed by ANN news network on १/०३/२०२२ ११:००:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".