आपतर्फे सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

पिंपरी : क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले  यांना सोमवारी त्यांच्या जयंतीनिमित्त  आम आदमी पक्षातर्फे अभिवादन करण्यात आले. 3 जानेवारी 2021 रोजी सुरू केलेल्या आम आदमी पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाला 1 वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानिमित्त पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे यांच्या संकल्पनेतून गरजू नागरिकांसाठी ई श्रम कार्डवाटपाची सुरुवात देखिल यावेळी करण्यात आली.   आम आदमी पार्टीच्या वतीने गेल्या वर्षभरात शहरात अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. प्रामुख्याने जागृती पालक संघटना, कष्टकरी घरेलू महिला कामगार संघटना तसेच आम आदमी रिक्षा चालक संघटना या संघटना स्थापन करण्यात आल्या व त्यामाध्यमातून विविध उपक्रम राबवले गेले.   साहित्यिक प्रकाश परदेशी, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर ननावरे, आपचे संपर्क प्रमुख वैजनाथ शिरसाठ यांनी मनोगत व्यक्त केले. मोहन जाधव,रमेश ठोंबरे यांच्या हस्ते ई श्रम कार्ड वाटप करण्यात आले.     या कार्यक्रमासाठी नारायण भोसले, मोहन जाधव, अविनाश नवसारे, शिंदे ,मनाली काळभोर, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
आपतर्फे सावित्रीबाई फुले यांना अभिवादन आपतर्फे सावित्रीबाई फुले यांना अभिवादन Reviewed by ANN news network on १/०३/२०२२ ११:०१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".