पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ङ्कअङ्कआणि ङ्कबङ्क क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील रस्तेसफाईचा ठेका मिळविण्यासाठी संबंधित ठेकेदार कंपनीने बनावट कागदपत्रे आणि खोटी बँकगॅरंटी देऊन महापालिकेची फसवणूक केली आहे. महापालिका आयुक्त या प्रकरणी कारवाई करत नाहीत. या प्रकरणात सध्या नगरसेवक असलेल्या एका माजी महापौराचा हात असून या प्रकरणी आयुक्तांनी तात्काळ कंपनीला काळ्या यादीत टाकून संबंधितांवर खटला दाखल करावा अन्यथा आपणास न्यायालयात दाद मागणे भाग पडेल आणि त्यात आयुक्तांनाही प्रतिवादी करावे लागेल असा इशारा भाजपचे नगरसेवक तुषार कामठे यांनी गुरुवारी दिला.
या संदर्भात कामठे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. त्यात ते बोलत होते. महापालिका ‘अङ्क आणि ‘बङ्क क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील रस्ते, गटारे सफाईच्या निविदेमध्ये तब्बल ५५ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप कामठे यांनी डिसेंबर महिन्याच्या महापालिका सर्वसाधारण सभेत यापूर्वीच केला होता.
ठेका घेणा-या सेक्युअर आयटी फॅसिलिटी मॅनेजमेंट या ठेकेदार संस्थेने इंदापूर नगरपरिषद आणि तुळजापूर, जि. उस्मानाबाद येथील मुख्याधिका-यांची बनावट स्वाक्षरी करुन अनुभव कागदपत्रे आणि बोगस लेटरहेड सादर केल्याचे सभागृहात सांगत आयुक्तांनी यावर आठ दिवसात कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, अद्यापही या बाबतीत कोणतीही कारवाई झालेली नाही. अशी स्थिती असतानाच सेक्युअर आयटी फॅसिलिटी मॅनेजमेंट कंपनीने बोगस बँक गॅरंटी सादर केल्याचे समोर आले आहे. ही बँकगॅरंटी खोटी असून ती बँकेकडून देण्यात आलेली नाही असे लेखी पत्र, बँकेने कामठे यांना दिले आहे.
आयुक्त राजेश पाटील या प्रकरणी गप्प का आहेत असा प्रश्न आपणाला पडला असून कदाचित त्यांच्या हाताखालील अधिकारी त्यांची दिशाभूल करत असावेत त्यामुळे आयुक्त कारवाई करत नसावेत असा अंदाज त्यांनी यावेळी व्यक्त केला. मात्र, अनेकदा विचारूनही त्यांनी या प्रकरणाशी संबंधित माजी महापौरांचे नाव घेणे टाळले. आपल्या हातात पुरावे आली की आपण ते नाव जाहीर करू असे कामठे यावेळी म्हणाले.
पिंपरी पालिकेत रस्तेसफाईच्या कामासाठी बनावट बँक गॅरेंटी : नगरसेवक तुषार कामठे यांचा आरोप
Reviewed by ANN news network
on
१/१३/२०२२ १०:०८:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: