पिंपरी चिंचवड प्रेसक्लबतर्फे बाळशात्री जांभेकर यांना आदरांजली

पिंपरी : महाराष्ट्र प्रेस क्लबच्या वतीने पिंपरी चिंचवड महापालिकेतील पत्रकार कक्षात पत्रकार दिन साजरा करण्यात आला. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर, स्व. भा. वि. कांबळे यांच्या प्रतिमेस पत्रकार अमोल शित्रे व ज्येष्ठ पत्रकार नाना कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पिंपरीचे आमदार आण्णा बनसोडे यांनी पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. यावेळी विकास शिंदे, संजय शिंदे, संदेश पुजारी, प्रदीप लोखंडे, विजय जगदाळे, गणेश हुंबे, गणेश मोरे, रवींद्र जगधने, जितेंद्र गवळी यांच्यासह ‘महाराष्ट्र प्रेस क्लब’चे सदस्य, पत्रकार उपस्थित होते. मनोगत व्यक्त करताना नाना कांबळे म्हणाले की, जगाचा विकास वेगाने होत आहे. प्रत्येक नवीन क्रांती वेळी महामारी येत असते. त्यानंतर जगात सर्वच गोष्टींमध्ये मोठे बदल होत असतात. काळानुरूप नवनवीन गोष्टी येत आहेत. तंत्रज्ञान वेगाने विकसित होत आहे. त्यानुसार पत्रकारितेतही आमूलाग्र बदलत होत आहेत. पत्रकारितेतील हे बदल स्वीकारणे काळाची गरज आहे. क्लबचे अध्यक्ष अमोल शित्रे म्हणाले की, पत्रकारांच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. आजच्या दिवसापासून तसा संकल्प करून कामाला सुरुवात करूया. तदनंतर पिंपरी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याला पत्रकारांनी अभिवादन केले. तसेच, एचए कॉलनीच्या प्रवेशद्वारावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला देखील पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
पिंपरी चिंचवड प्रेसक्लबतर्फे बाळशात्री जांभेकर यांना आदरांजली पिंपरी चिंचवड प्रेसक्लबतर्फे बाळशात्री जांभेकर यांना आदरांजली Reviewed by ANN news network on १/०६/२०२२ ११:०१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".