पिंपरी : मेट्रोच्या अधिका-यांनी पुणे व पिंपरी चिंचवड शहरांचे महापौर, पदाधिकारी यांना कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता गुप्तपणाने ट्रायल रन घेतली. त्यांच्या या कामकाजातून दुटप्पीपणाची वागणूक दिली जात असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. सध्या राज्यावर कोरोना सावट असताना ट्रायल रन घेणे कितपत योग्य आहे ? असा सवाल पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे यांनी उपस्थित केला आहे.
महापौर कार्यालयाकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात असे म्हतले आहे की, पुणे महामेट्रो हा प्रकल्प केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून साकारला जात आहे. ही ट्रायल रन घेताना कोणत्याही स्वरुपाचे राजकीय शिष्टाचार पाळण्यात आलेले नाहीत. आपला देश हा लोकशाही प्रधान असून वैधानिक पदावरील व्यक्तींना विश्वासात घेऊन चालण्याची आपली परंपरा राहिलेली आहे. तरी देखील पुणे तसेच पिंपरी चिंचवड शहरातील स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता कोणत्याही प्रकारचे वैधानिक पद नसलेल्या तसेच ठराविक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना डोळ्यासमोर ठेऊन महामेट्रोचा मनमानी कारभार सुरु असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. महामेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकांची संपूर्ण कृती ही लोकशाहीचा अवमान करणारी आहे. त्यामुळे महामेट्रोच्या संपूर्ण गलथान व गैरजबाबदार कारभाराबद्दल आम्ही असमाधानी असून त्याबद्दल लवकरच केंद्र व राज्य शासनाकडे पालिकेच्या वतीने तक्रार करण्यात येणार आहे. आम्ही त्यांचा निषेध करीत आहोत.
महापौरांनी केला ब्रिजेश दीक्षित यांचा निषेध; ‘ट्रायल रन’ वरून श्रेयवाद सुरू
Reviewed by ANN news network
on
१/१७/२०२२ १०:४७:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: