खासदार शरद पवार यांनी केली मेट्रोची पाहणी

पिंपरी : राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी सोमवारी सकाळी फुगेवाडी ते पिंपरी चिंचवड महापालिका असा प्रवास मेट्रोमधून करून शहरातील मेट्रोप्रकल्पाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित आमदार अण्णा बनसोडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी आमदार विलास लांडे, प्रवक्ता अंकुश काकडे, पिालिकेतील वरोधी पक्षनेता राजू मिसाळ, नगरसेवक नाना काटे, शहर सरचिटणीस फजल शेख आदी उपस्थित होते. डॉ. दीक्षित यांनी मेट्रोच्या संपूर्ण कामाची शरद पवार यांना माहिती दिली. फुगेवाडी कार्यालयात मेट्रोकडून शरद पवार यांना मेट्रोच्या कामाबद्दलचे प्रेझेंटेशन देण्यात आले. शरद पवार यांनी मेट्रोच्या अधिका-यांशी संवाद साधत माहिती जाणून घेतली. पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रोचे काम अंतिम टप्प्यात आहे. नावात पिंपरी चिंचवड हवे ! राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्वाकांक्षी प्रकल्पापैकी पिंपरी चिंचवड मेट्रो हा एक प्रकल्प आहे. मनपामध्ये राष्ट्रवादीची सत्ता असताना या प्रकल्पास मंजूरी दिलेली आहे. त्याचप्रमाणे महाआघाडीची सत्ता असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरातील मेट्रोसाठी भरीव आर्थिक तरतूद केलली आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे पुणे पिंपरी चिंचवड मेट्रो असे नामकरण करावे अशी मागणी पालिकेतील विरोधीपक्ष नेता राजू मिसाळ यांनी यावेळी खासदार शरद पवार यांच्याकडे केली. त्यावर याबाबत केंद्रसरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन पवार यांनी मिसाळ यांना दिले.
खासदार शरद पवार यांनी केली मेट्रोची पाहणी खासदार शरद पवार यांनी केली मेट्रोची पाहणी Reviewed by ANN news network on १/१७/२०२२ १०:५०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".