पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाच्या पहिल्या आणि दुस-या लाटेच्यावेळी झालेल्या भ्रष्टाचाराबाबत अद्यापही आरोप; प्रत्यारोप सुरू असतानाच महापालिकेने कोरोनाग्रस्त रुग्णांशी फोनद्वारे संपर्क साधण्यासाठी पूर्वीच्याच संस्थेला ठेका देण्याचे निश्चित केले असून महापालिका एका कॉलसाठी तब्बल १३ रुपये या संस्थेला देणार आहे. याबाबतच्या आयत्यावेळच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली.
मागील कोरोना लाटांच्यावेळी ऑरनेट टेकनोलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेने २९ एप्रिल २०२१ ते २८ जुलै २०२१ या कालावधीत हे काम केले होते. तेव्हाही एका कॉलसाठी १३ रुपये हाच दर देण्यात आला होता. राजकीय व्यक्तीचे हितसंबंध जोपासण्यासाठी अशा चढ्यादराने ठेका देण्यात आल्याची टीका त्यावेळी केली जात होती. एव्हढेच नव्हे तर, कॉल करून योग्यप्रकारे माहिती दिली जात नसल्याचा अनेक रुग्णांचा आक्षेप होता.
गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांना दिवसातून एक वेळ कॉल करून औषधोपचाराची माहिती घेण्यासाठी तेव्हा कॉलसेंटरची स्थापना करण्यात आली होती. आता पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागल्याने एका कॉलकरिता १३ रुपये या दराने ऑरनेट टेकनोलॉजीज यांना पुन्हा काम देण्यात आले आहे. ८ जानेवारी २०२२ पासून दोन महिने कालावधीकरिता हे कॉल सेंटर सुरू राहणार आहे.
एका कॉलसाठी तब्बल १३ रुपये खर्चून पालिका गृहविलगीकरणातील रूग्णाशी संपर्क साधणार
Reviewed by ANN news network
on
१/१३/२०२२ १०:१०:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: