पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका नवीन भोसरी रुग्णालयातील तळमजल्यावर अद्ययावत वैद्यकीय संदर्भ ग्रंथालय उभारणार आहे अशी माहिती स्थायी समितीचे सभापती अॅड. नितीन लांडगे यांनी दिली.
बुधवारी ऑनलाईन झालेल्या स्थायी समितीच्या या विषयाला मान्यता देण्यात आली.या वैद्यकीय संदर्भ ग्रंथालयाचा उपयोग शहरातील ३ हजार ५०० हून अधिक डॉक्टरांना होणार आहे.
या ग्रंथालयात वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित संदर्भ ग्रंथ, संशोधन ग्रंथ, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिध्द होणारी वैद्यकीय क्षेत्रातील मासिके, प्रबंध, नामवंत डॉक्टर व संशोधकांचे नवनविन ग्रंथ याठिकाणी डॉक्टरांना अभ्यासता येणार आहेत.
सर्वच क्षेत्रात संगणकीकरणाचे प्रमाण दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. वैद्यकीय क्षेत्रात देखील रोबोट सर्जरी विषयीची माहिती देणारे संदर्भ ग्रंथ देखील येथे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
पालिका अद्ययावत वैद्यकीय संदर्भ ग्रंथालय उभारणार अॅड. नितीन लांडगे
Reviewed by ANN news network
on
१/२०/२०२२ १०:१३:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: