लोणावळा : लोणावळ्यातील १७ नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या बातम्या तथ्यहीन असून लोणावळा शहरातील शिवसेनेचे सर्व नगरसेवक पक्षा सोबत आहे. यातील एकही नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाणार नाही. आगामी लोणावळा नगरपरिषदेची निवडणूक देखील शिवसेना पुर्ण ताकदीने शिवसेनेच्या चिन्हावर लढविणार असल्याचा खुलासा शिवसेनेचे मावळ तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, शहरप्रमुख बाळासाहेब फाटक व शिवसेनेच्या सभागृहातील गटनेत्या शादान चौधरी यांनी केला आहे.
काही मंडळींनी राजकीय फायद्यासाठी लोणावळ्यातील १७ नगरसेवक राष्ट्रवादीच्या गळाला असा बातम्या पेरल्या मात्र त्यामध्ये कसलेही तथ्य नाही. लोणावळा नगरपरिषदेच्या १० जानेवारी रोजीच्या विशेष सर्वसाधारण सभेतील काही विषयांवर नाराज झालेले काँग्रेसचे नगरसेवक हे शिवसेना व सहयोगी पक्षाच्या इतर नगरसेवकांसोबत वडगाव मावळ येथे एका हॉटेलवर थांबले असताना त्याठिकाणी मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी नगरसेवकांची भेट घेतली. मात्र या घटनेचा विपर्यास करण्यात आल्याचा खुलासा खांडभोर यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख शरद हुलावळे, तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, लोणावळा शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, शिवसेना गटनेत्या शादान चौधरी, नगरसेवक शिवदास पिल्ले, माणिक मराठे, नितिन आगरवाल, कल्पना आखाडे, सिंधू परदेशी, तालुका समन्वयक अंकूश देशमुख, उप तालुकाप्रमुख आशिष ठोंबरे, युवासेना प्रमुख शाम सुतार, महिला प्रमुख अनिता गोणते, मनिषा भांगरे, संजय भोईर, भगवान देशमुख आदी उपस्थित होते.
शादान चौधरी म्हणाल्या, लोणावळा नगरपरिषदेत मागील पाच वर्ष शिवसेनेने विरोधी पक्षाची भुमिका बजावली आहे. शेवटच्या मिटिंगला देखील कोरम पूर्ण करण्याची जबाबदारी सत्ताधारी भाजपा व काँग्रेस पक्षाची होती मात्र त्यांच्यात काही बेबनाम झाल्याने काँग्रेस आमच्या सोबत आली व त्यांचा कोरम पुर्ण न झाल्याने दोन्ही सभा तहकूब झाल्या. शिवसेना काही अपक्ष व भाजपाचे काही नगरसेवक आम्ही सुरुवातीपासून विरोधी गटात आहे. आमदार सुनिल शेळके हे महाविकास आघाडीचे आमदार असल्याने काही मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आम्ही त्यांची भेट घेतो, याचा अर्थ आम्ही राष्ट्रवादीच्या वाटेवर आहे असा होत नाही.
राज्यात महाविकास आघाडी असली तरी स्थानिक पातळीवर निवडणुका कशा लढविल्या जाणार याबाबत वरिष्ठ निर्णय घेतील. मात्र आगामी लोणावळा नगरपरिषदेची आगामी निवडणूक स्वबळावर लढविण्यासाठी तयारी शिवसेना करत असून लोणावळा शहरातील पर्यटनाच्या मुद्दयावर ही निवडणूक लढविणार असल्याचे तालुकाप्रमुख राजेश खांडभोर आणि शहरप्रमुख बाळासाहेब फाटक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.--
लोणावळ्यातील १७ नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या बातम्या तथ्यहीन : शिवसेना
Reviewed by ANN news network
on
१/२०/२०२२ १०:१९:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: