‘होऊ द्या खर्च; आपल्याच घरचं’ : प्रशासनाची मागणी ५ कोटींची सत्ताधारी म्हणतात १० कोटी खर्च करा

पिंपरी : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे महापालिका निवडणुकीची आचारसंहिता जारी न झाल्याने पालिकेतील सत्ताधारी भाजपला जो अधिक कालावधी मिळाला आहे त्याचा वापर करून ‘होऊ द्या खर्च; आपल्याच घरचं’ अशा न्यायाने कारभार सुरू झाला असल्याचे दिसत आहे. बुधवारी झालेल्या स्थायीसमितीच्या बैठकीत याचा पुरेपूर प्रत्यय विरोधकांना आला आहे. बुधवारी झालेल्या स्थायीसमितीच्या बैठकीसमोर पालिकेच्या अग्निशमन विभागाकडून दोन ‘फायर टेंडर’ वाहने खरेदी करण्यासाठी ५ कोटी रुपये खर्च करण्यास मान्यता मिळण्यासाठी आयत्यावेळेच्या विषयात प्रस्ताव आणण्यात आला होता. मात्र,सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनीपाच कोटींऐवजी दहा कोटी रुपये खर्च करून दोन ऐवजी चार ‘फायर टेंडर वाहने खरेदी करण्याची उपसूचना देऊन त्याला मान्यता दिली. आणि त्यासाठी येणा-या वाढीव खर्चास उपसूचनेद्वारे मान्यता दिली. महापालिकेच्या अग्निशमन विभागाने खरेदी करण्यासाठी प्रशासनाला पत्राद्वारे कळविले होते. त्यानुसार वाहन दुरुस्ती कार्यशाळा विभागामार्फत निविदा प्रसिद्ध करण्यात आली. त्यात चिखलीतील हायटेक सर्व्हिसेस यांनी दिलेले दर स्वीकारण्याजोगे असल्याचे अग्निशमन अधिकारी किरण गावडे यांनी कळविले. त्यानुसार आयुक्त राजेश पाटील यांनी ही दोन वाहने हायटेक सर्व्हिसेकडून खरेदी करण्याचा आयत्यावेळचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवला होता. त्यावर सत्ताधारी भाजपने या प्रस्तावाला मान्यता देतानाच महापालिका कार्यक्षेत्रातील प्रत्यक्षात कार्यरत सहा अग्निशामक केंद्रे, महापालिकेचे भौगोलिक क्षेत्राचे कारण देत दोन ऐवजी चार ‘फायर टेंडर’ खरेदी करण्यास आणि त्यासाठी येणा-या खर्चास उपसूचनेद्वारे मान्यता दिली.
‘होऊ द्या खर्च; आपल्याच घरचं’ : प्रशासनाची मागणी ५ कोटींची सत्ताधारी म्हणतात १० कोटी खर्च करा ‘होऊ द्या खर्च; आपल्याच घरचं’  : प्रशासनाची मागणी ५ कोटींची सत्ताधारी म्हणतात १० कोटी खर्च करा Reviewed by ANN news network on १/२०/२०२२ १०:११:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".