तळेगावात १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू

तळेगाव दाभाडे : राज्यशासनाने कोरोना लसीकरणाची सक्ती केल्याने प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरणासाठी मोठ्या रांगा लागत आहेत. तर १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण त्या त्या शाळामध्ये जाऊन करण्याची मोहीम तळेगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्राने सोमवारपासून सुरु केली आहे. तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत आत्तापर्यंत ७१ हजार ९४७ नागरिकांनी लसीकरण पूर्ण केले असल्याचे डॉ दिनेश महालींगे यांनी सांगितले. तर तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उपाकेंद्रमधून ५१ हजार १२४ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. तळेगाव शहर रीक्रिएशन हॉल, उपकेंद्र इंदोरी अंतर्गत माळवाडी, सुदावडी, सुदुंबरे मधून २२ हजार ३७४ नागरिकांचे लसीकरण केले आहे. तर उपकेंद्र निगडे अंतर्गत आंबळे, मंगळूर, गोळेवाडी येथे ३ हजार २२७ नागरिकाचे लसीकरण झाले आहे. तसेच आंबी या उपकेंद्रात १४ हजार ५२३ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यामध्ये वारंगवाडी, नवलाखउब्रे, मिंडेवाडी, जाधववाडी, जांभावडे, वराळे, नानावली या गावांचा समावेश आहे. शासनाच्या आदेशान्वये सोमवार पासून वयोगट १५ ते १८ मधील विद्यार्थ्यांचे लसीकरण प्रत्येक शाळेत जाऊन सुरु केले आहे. तळेगाव दाभाडे येथील ज्ञानेश्वर प्राथमिक शाळेतील ९ ते १० वीच्या ६८ विद्यार्थ्याचे लसीकरण सोमवारी करण्यात आले. या मोहिमेचा आरंभ माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, सभापती ज्योती शिंदे, माजी उपसभापती शांताराम कदम, मावळचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे, गुनेश बागडे, तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकिय अधिकारी दिनेश महालींगे, सहाय्यक दीपक ढवळे, आरोग्य सहाय्यिका मंगल धायगुडे, रेखा कांबळे, नवनाथ पानसरे, मुख्याध्यापक अमोल पाटील आदी उपस्थित होते. शालेय विद्यार्थी लसीकरण मोहीम तळेगाव शहर परिसरातील २२ शाळांमधील १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी राबविली जाणार आहे.
तळेगावात १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू तळेगावात १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू Reviewed by ANN news network on १/०४/२०२२ ०९:५७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".