भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्र आणि मंडईचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते : अ‍ॅड. नितीन लांडगे

पिंपरी : भोसरी येथील पै. मारुतराव रावजी लांडगे, आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे आणि संत ज्ञानेश्वर भाजी मंडई व व्यापारी संकुलाचे उद्घाटन 26 जानेवारी  रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार असून त्यासाठी  आवश्यक कामे तातडीने पूुर्ण करावीत अशी मागणी स्थायी समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन लांडगे यांनी पालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे. भोसरी गावजत्रा मैदानाशेजारी पालिकेने  पै. मारुतराव लांडगे, आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र उभारले आहे. या केंद्राचे उर्वरित काम लवकर पूुर्ण करावे अशी सूचना लांडगे यांनी केली आहे. भोसरी येथील संत ज्ञानेश्वर भाजी मंडईत 173 मंडईचे गाळे होते. आता आकर्षक रचनेसह पर्यावरणपूरक नविन संत ज्ञानेश्वर भाजी मंडई व व्यापारी संकुलात 188 मंडईचे गाळे विकसित करण्यात आले आहेत. येथे तळमजल्यावर 29, पहिल्या मजल्यावर 31 आणि दुसर्‍या मजल्यावर 31 असे एकूण 91 वाणिज्य गाळे उभारण्यात आले आहेत. येथे लिफ्टची व्यवस्था असून विद्युत, पाणी पुरवठा, आरोग्य आणि अग्निशमन अशा सर्व सुविधा पुर्ण झाल्या आहेत. या गाळ्यांच्या वितरणाची तयारी प्रशासनाने पूुर्ण केली आहे. याचे उद्घाटनही 26 जानेवारी रोजी फडणवीस यांच्या हस्ते करण्याचे नियोजन आहे अशी माहिती लांडगे यांनी प्रसिध्दीस दिली आहे.
भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्र आणि मंडईचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते : अ‍ॅड. नितीन लांडगे भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्र आणि मंडईचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते : अ‍ॅड. नितीन लांडगे Reviewed by ANN news network on १/०३/२०२२ ११:०४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".