नागरिकांनी काळजी घ्यावी : महापौर माई ढोरे

पिंपरी : आधी कोरोना आणि आता ओमिक्रॉनमुळे या साथीची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांनी गाफील न राहता काळजी घ्यावी, असे आवाहन महापौर माई ढोरे यांनी केले आहे. नागरिकांनी कोरोना संदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करावे. मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा; आणि सुरक्षित अंतर राखावे. तसेच लवकरात लवकर कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घ्यावे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे टाळावे. शाळा महाविद्यालयात शिक्षक, पालक व विद्यार्थी यांनी दक्षता घ्यावी. पालिका करत असलेल्या उपाययोजनांना नागरिकांनी सहकार्य करावे असेही आवाहन महापौर ढोरे यांनी केले आहे.
नागरिकांनी काळजी घ्यावी : महापौर माई ढोरे  नागरिकांनी काळजी घ्यावी : महापौर माई ढोरे Reviewed by ANN news network on १/०४/२०२२ ०९:५९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".