पिंपरी : पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग क्रमांक 30 च्या युवती अध्यक्ष मनाली कुटे यांच्यासह शेकडो युवतींनी खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी पिंपरी चिंचवड युवासेना अधिकारी विश्वजीत बारणे,पिंपरी युवासेनाप्रमुख निलेश हाके,युवती अधिकारी प्रतीक्षा घुले आदी उपस्थित होते.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर युवा कार्यकर्त्यांचा मोठा विश्वास आहे. त्यामुळेच युवा कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. युवा सैनिकांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहचवावेत. लोकांमध्ये मिळून काम करावे. त्यांच्या अडी-अडचणींना धावून जावे.
मनाली कुटे म्हणाल्या की, पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून मी आज शिवसेनेत प्रवेश करत आहे. आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण करत तळागाळापर्यंत काम करण्याचा मानस आहे.
राष्ट्रवादीच्या युवती प्रभाग अध्यक्ष मनाली कुटे यांचा शिवसेनेत प्रवेश
Reviewed by ANN news network
on
१/०३/२०२२ ११:०३:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: