डुडुळगावातील महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

आळंदी : डुडुळगाव, आळंदी येथील श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचालित, शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे निमित्त ’सावित्रीबाई फुले आणि आजची स्त्री’ या विषयावर अ‍ॅडव्होकेट क्रांती कराळे गारगोटे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अ‍ॅडव्होकेट कराळे यांनी सावित्रीबाई फुले यांचा जीवन परिचय करून देत. त्यांनी अज्ञान, अंधश्रद्धा आणि अनिष्ट रूढी यातून स्त्रियांची शिक्षणाच्या माध्यमातून कशी सुटका केली. याबाबत सविस्तर विवेचन करीत आजची स्त्री हुंडाबळी, भ्रूण हत्या, बलात्कार व ऍसिड हल्ले यापासून कशी सुरक्षित राहू शकते याबाबत याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. प्रा.सोनाली अभंग, प्रा. शैला तापकीर, पूजा बवले, यश भोरे व रुपेश बरणे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. हंसराज थोरात यांनी आज स्त्रियांनी सावित्रीबाईच्या विचाराचा वसा आणि वारसा चालविण्याची गरज व्यक्त आहे असे मत व्यक्त केले. या निमित्ताने महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर महिला सहकार्‍यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी,डॉ. रणजीत कदम, संजीव कांबळे व प्रेरणा पाटील यांनी केले. सूत्रसंचालन .करिष्मा सातपुते यांनी केले. प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रेरणा पाटील यांनी करून दिला तर आभार दिपाली सोनवणे यांनी मानले.
डुडुळगावातील महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी डुडुळगावातील महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी Reviewed by ANN news network on १/०३/२०२२ १०:५७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".