पिंपरी : आजची महिला देशाच्या राष्ट्रपतीपदी, पंतप्रधानपदी आणि अन्य महत्वाच्या पदी पोहोचली याचे श्रेय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले यांना आहे असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस आणि पिंपरी चौक येथील त्यांचे स्मारक तसेच मोशी महानगरपालिका शाळेमधील त्यांच्या पुतळ्यास महापौर माई ढोरे यांनी अभिवादन केले त्यावेळी त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमास उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, आयुक्त राजेश पाटील, शहर सुधारणा समिती अध्यक्षा अनुराधा गोरखे, शिक्षण समिती सभापती माधवी राजापुरे, महिला व बाल कल्याण समिती सभापती सविता खुळे, संगिता सस्ते, नगरसदस्य संतोष लोंढे, बन्सी पारडे, मारुती भापकर, गिरीजा कुदळे, मोहम्मद अब्रार, अलका डुंबरे, मानव कांबळे, आनंदा कुदळे,अंबर चिंचवडे, आदी उपस्थित होते.
महापौर म्हणाल्या, आज भारतीय महिला देशातील तसेच विदेशातील अनेक उच्च पदे महिला समर्थपणे भुषवित आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात देखील महिला सर्वच क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी करताना दिसत आहेत. महिला सक्षमीकरणासाठी सर्वांनी महिला शिक्षणाला प्राधान्य देण्यासाठी प्रयत्न करावेत असेही त्या म्हणाल्या. महिला शिक्षण दिनानिमित्त त्यांनी सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या.
क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांना पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे अभिवादन
Reviewed by ANN news network
on
१/०३/२०२२ १०:५५:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: