मावळातील छोटे व्यावसायिक मनाई आदेशामुळे अस्वस्थ

तळेगाव : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिका-यांनी मावळ तालुक्यात ऐतिहासिक गड,किल्ले, ऐतिहासिक वास्तू, स्मारके, धरणे व पर्यटन स्थळावर फिरण्यासाठी बंदी घातली आहे. तसेच जमावबंदीचे आदेश देखील निर्गमित केले आहेत. या निर्णयामुळे तेथील व्यवसायिकांच्यामध्ये आस्वस्थता पसरली असून त्यांच्या रोजीरोटीवर पुन्हा एकदा कोरोनामुळे गदा आलेली आहे. पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी याबाबत शासन आदेश जारी केलेला आहे. या आदेशानुसार मावळातील लोणावळ्या जवळील भुशीधरण, घुबडतलाव,तुंगार्ली धरण,राजमाचीपोइंर्ट, मक्कीपोइंर्ट, अमृतांजण ब्रिज, लायन पोइंर्ट आदी ठिकाणी पर्यटकांना येण्यास मनाई करण्यात आलेली आहे. याशिवाय वेहरगाव येथील कार्ला भाजे लेणी, घोरवाडेश्वर लेणी, लोहगड किल्ला तुंग, तिकोना, विसापूर किल्ला पवनाधरण याठिकाणाचाहि आदेशामध्ये समावेश आहे. या निर्णयामुळे पर्यटन स्थळाच्या परीसरामध्ये असलेले हॉटेल व्यवसायिक चहा वडापाव टप-याधारक या धार्मिक स्थळावरील प्रसाद, हार, हळद,कुंकू याचे व्यवसायिक, तसेच रिक्षा, चारचाकी वाहतूकदार यांना आर्थिक फटका बसणार असल्याने त्यांच्यामध्ये अस्वस्थता पसरली आहे.
मावळातील छोटे व्यावसायिक मनाई आदेशामुळे अस्वस्थ मावळातील छोटे व्यावसायिक मनाई आदेशामुळे अस्वस्थ Reviewed by ANN news network on १/१२/२०२२ ११:११:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".