पिंपरी चिंचवड महापालिकेत अधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उपायुक्त, सहाय्यक आयुक्तांच्या कामकाजामध्ये फेरबदल झाले आहेत. निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांच्याकडे प्रशासनाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. तर, आकाशचिन्ह परवाना विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांच्याकडे करसंकलन विभागाची जबाबदारी दिली आहे. उपायुक्त सुभाष इंगळे यांच्याकडील प्रशासन विभाग काढून केवळ उद्यान विभागाची जबाबदारी ठेवली आहे. उपायुक्त स्मिता झगडे यांच्याकडील करसंकलन व कर आकारणी विभागाचा पदभार काढून त्यांच्याकडे एलबीटी आणि पशु वैद्यकीय विभाग सोपविला आहे. तसेच पिंपरी विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी पदाची जबाबदारी त्यांच्याकडे असणार आहे. सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांच्याकडे निवडणूक विभाग, दक्षता समितीचा प्रशासकीय कार्यभार यासह प्रशासनाचा अतिरिक्त पदभार दिला. सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांच्याकडे आकाशचिन्ह परवाना विभागासह करसंकलन विभागाची जबाबदारी दिली. त्यांच्याकडे चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी पदाची जबाबदारीही असेल. सहाय्यक आयुक्त राजेश आगळे यांच्याकडील प्रशासन काढून केवळ ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयाचा पदभार ठेवला. तर, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्याकडील जनता संपर्क विभागाची जबाबदारी प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे यांच्याकडे सोपविली आहे. आयुक्तांनी हे फेरबदल केले आहेत
पिंपरी चिंचवड महापालिकेत अधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल पिंपरी चिंचवड महापालिकेत अधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल Reviewed by ANN news network on १/१२/२०२२ १०:३१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".