पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेची प्रारुप प्रभागरचना मंगळवारी जाहीर झाली. सर्वात कमी लोकसंख्या प्रभाग क्रमांक ३७- ताथवडे, पुनवळे, काळाखडक या भागाची असून ती ३२ हजार ६६४ इतकी आहे. तर, सर्वात मोठा प्रभाग तळवडे असून तेथील लोकसंख्या ४० हजार ७६७ आहे. चार सदस्यांचा प्रभाग असलेल्या सांगवीतील लोकसंख्या ४६ हजार ९७९ आहे.भौगोलिकदृष्ट्या प्रभाग क्रमांक पाच चèहोली सर्वांत मोठा तर सॅण्डविक कॉलनी, रामनगर सर्वांत छोटा प्रभाग असणार आहे.
२०१७ मधील निवडणूक चार नगरसेवकांच्या प्रभागपद्धतीने झाली. सध्या शहरात ३२ प्रभाग आहेत. आता तीनसदस्यीय पद्धतीनुसार ४६ प्रभाग होणार असून त्यातील४५ प्रभाग ३ नगरसेवकांचे तर १ प्रभाग ४ नगरसेवकांचा असणार आहे. प्रभागाचा कच्चा आराखडा राज्य निवडणूक आयोगाला सादर केल्यानंतर त्यामध्ये ५० वेळा सुधारणा करण्यात आली आहे. अनुसूचित जातींसाठी १६ टक्के आरक्षण आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीनंतर १३९ सदस्यांच्या महापालिका सभागृहात २२ सदस्य अनुसूचित जातींचे असतील. त्यात प्रत्येकी ११ महिला व पुरुषांचा समावेश असेल.अनुसूचित जमातीसाठी ३ टक्के आरक्षण असल्यामुळे अनुसूचित जमातीतील सदस्य संख्या तीनच राहणार आहे.
२९, १९, २०, २२, ४३, ११, ३७, १८, २९, ३४, १६, ३५, १७, ४४, ३९, ३२, ४६, ४१, १४, २५, ३८, ३३ हे २२ प्रभाग अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत. तर, अनुसूचित जमातीतील सदस्य संख्या तीनच राहणार आहे. त्यांच्यासाठी प्रभाग ४१, ५ आणि ६ हे आरक्षित असणार आहेत.
प्रभाग आणि त्यातील समाविष्ट परिसर ढोबळमानाने पुढील प्रमाणे आहे.
प्रभाग क्रमांक १ - तळवडे, रुपीनगर, त्रिवेणीनगर, प्रभाग क्रमांक २ - चिखलीगावठाण, मोरेवस्ती, कुदळवाडी,प्रभाग क्रमांक ३ - बोèहाडेवाडी, जाधववाडी,प्रभाग क्रमांक ४ - मोशी गावठाण, डुडुळगाव, गंधर्वनगरी, प्रभाग क्रमांक ५ - चèहोली, चोविसावाडी, वडमुखवाडी, प्रभाग क्रमांक ६ - दिघी, गणेशनगर, बोपखेल, प्रभाग क्रमांक ७ - सँण्डविक कॉलनी, रामनगर, प्रभाग क्रमांक ८ - भोसरी गावठाण, गवळीनगर, शितलबाग, प्रभाग क्रमांक ९ - धावडेवस्ती, चक्रपाणी वसाहत, प्रभाग क्रमांक १० - इंद्रायणीनगर, लांडेवाडी, शांतीनगर, गव्हाणेवस्ती, प्रभाग क्रमांक ११ - गवळीमाथा, बालाजीनगर, प्रभाग क्रमांक १२ - घरकुल, नेवाळे वस्ती, हरगुडे वस्ती, प्रभाग क्रमांक १३ - मोरेवस्ती, म्हेत्रेवस्ती, प्रभाग क्रमांक १४ - यमुनानगर, फुलेनगर, प्रभाग क्रमांक १५ - संभाजीनगर, पूर्णानगर, शाहूनगर, प्रभाग क्रमांक १६ - नेहरुनगर, विठ्ठलनगर, यशवंतनगर, प्रभाग क्रमांक १७ - वल्लभनगर, एच.ए.कॉलनी, संत तुकारामनगर, महात्मा फुलेनगर, प्रभाग क्रमांक १८ - मोरवाडी, एम्पायर इस्टेट, अजमेरा कॉलनी, गांधीनगर, खराळवाडी, प्रभाग क्रमांक १९ - चिंचवड स्टेशन, दत्तनगर, मोहननगर, इंदिरानगर, आनंदनगर, प्रभाग क्रमांक २० - काळभोरनगर, विद्यानगर, रामनगर, दत्तनगर, अजंठानगर, प्रभाग क्रमांक २१ - आकुर्डीगावठाण, गंगानगर, दत्तवाडी, प्रभाग क्रमांक २२ - ओटास्कीम, निगडी गावठाण, साईनाथनगर, प्रभाग क्रमांक २३ - वाहतूकनगरी, भक्ती-शक्ती, केंद्रीय वसाहत, प्रभाग क्रमांक २४ - मामुर्डी, किवळे, विकासनगर, रावेत, प्रभाग क्रमांक २५ - वाल्हेकरवाडी, गुरुद्वारा, शिंदेवस्ती, प्रभाग क्रमांक २६ - बिजलीनगर, दळवीनगर, भोईरनगर, चिंचवडेनगर, प्रभाग क्रमांक २७ - चिंचवडगाव, उद्योगनगर, प्रेमलोक पार्क, प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह, प्रभाग क्रमांक २८ - केशवनगर, यशोपुरम, श्रीधरनगर, प्रभाग क्रमांक २९ - भाटनगर, मिलिंदनगर, पिंपरी कॅम्प, जिजामाता हॉस्पिटल, प्रभाग क्रमांक ३० - पिंपरीगाव, अशोक थिएटर, वैभवनगर, प्रभाग क्रमांक ३१ - काळेवाडी, विजयनगर, नढेनगर, प्रभाग क्रमांक ३२ - तापकीरनगर, रहाटणी, ज्योतिबानगर, प्रभाग क्रमांक ३३ - रहाटणी, रामनगर, शिवतिर्थनगर, प्रभाग क्रमांक ३४ - बापुजीबुवानगर, ज्ञानेश्वर कॉलनी, अशोका सोसायटी, प्रभाग क्रमांक ३५ - थेरगाव, बेलठिकानगर,
पवारनगर, प्रभाग क्रमांक ३६ - गणेशनगर, संतोषनगर, पद्मजी पेपर मिल, प्रभाग क्रमांक ३७ - ताथवडे, पुनावळे, काळाखडक, प्रभाग क्रमांक ३८ - वाकड, भुमकरवस्ती, कस्पटेवस्टी, वाकडकर वस्ती, प्रभाग क्रमांक ३९ - पिंपळेनिलख, विशालनगर, वेणुनगर, पोलीस लाईन, कावेरीनगर, प्रभाग क्रमांक ४० - पिंपळेसौदागर, कुणाल ऑयकॉन, प्लॅनेट मिलेनियम, प्रभाग क्रमांक ४१ - पिंपळेगुरव गावठाण, जवळकरनगर, वैदुवस्ती, प्रभाग क्रमांक ४२ - कासारवाडी, फुगेवाडी, कुंदननगर, वल्लभनगर, प्रभाग क्रमांक ४३ - दापोडी, गणेशनगर, महात्मा फुलेनगर, प्रभाग क्रमांक ४४ - पिंपळेगुरव, काशिदनगर, मोरया पार्क, प्रभाग क्रमांक ४५ - नवी सांगवी, किर्तीनगर, विनायकनगर, गजानन महाराज नगर, प्रभाग क्रमांक ४६ - जुनी सांगवी, ममतानगर, जयमालानगर, शितोळेनगर
प्रभागरचना प्रसिद्ध झाल्यामुळे आता १ ते १४ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत नागरिकांना त्यावर हरकती घेता येतील सूचना करता येतील. या प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांचे विवरणपत्र १६ फेब्रुवारी रोजी राज्य निवडणूक आयोगास सादर केले जाईल. राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकाèयांमार्फत हरकती व सूचना यावर सुनावणी घेण्याचा अंतिम दिनांक २६ फेब्रुवारी असणार आहे. सुनावणीनंतर प्राधिकृत अधिकाèयांनी केलेल्या शिफारशींचे विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगास २ मार्च २०२२ रोजी पाठवले जाईल.
अनुसूचित जातीसाठी राखीव असणारे प्रभाग (२२ जागा)
प्रभाग क्रमांक ११ - गवळीमाथा, बालाजीनगर, प्रभाग क्रमांक १४ - यमुनानगर, फुलेनगर, प्रभाग क्रमांक १६ - नेहरुनगर, विठ्ठलनगर, यशवंतनगर, प्रभाग क्रमांक १७ - वल्लभनगर, एच.ए.कॉलनी, संत तुकारामनगर, महात्मा फुलेनगर,प्रभाग क्रमांक १८ - मोरवाडी, एम्पायर इस्टेट, अजमेरा कॉलनी, गांधीनगर, खराळवाडी, प्रभाग क्रमांक १९ - चिंचवड स्टेशन, दत्तनगर, मोहननगर, इंदिरानगर, आनंदनगर, प्रभाग क्रमांक २० - काळभोरनगर, विद्यानगर, रामनगर, दत्तनगर, अजंठानगर, प्रभाग क्रमांक २२ - ओटास्कीम, निगडी गावठाण, साईनाथनगर, प्रभाग क्रमांक २४ - मामुर्डी, किवळे, विकासनगर, रावेत, प्रभाग क्रमांक २५ - वाल्हेकरवाडी, गुरुद्वारा, शिंदेवस्ती, प्रभाग क्रमांक २९ - भाटनगर, मिलिंदनगर, पिंपरी कॅम्प, जिजामाता हॉस्पिटल, प्रभाग क्रमांक ३२ - तापकीरनगर, रहाटणी, ज्योतिबानगर, प्रभाग क्रमांक ३३ - रहाटणी, रामनगर, शिवतिर्थनगर, प्रभाग क्रमांक ३४ - बापुजीबुवानगर, ज्ञानेश्वर कॉलनी, अशोका सोसायटी, प्रभाग क्रमांक ३५ - थेरगाव, बेलठिकानगर, पवारनगर, प्रभाग क्रमांक ३७ - ताथवडे, पुनावळे, काळाखडक, प्रभाग क्रमांक ३८ - वाकड, भुमकरवस्ती, कस्पटेवस्टी, वाकडकर वस्ती, प्रभाग क्रमांक ३९ - पिंपळेनिलख, विशालनगर, वेणुनगर, पोलीस लाईन, कावेरीनगर, प्रभाग क्रमांक ४१ - पिंपळेगुरव गावठाण, जवळकरनगर, वैदुवस्ती, प्रभाग क्रमांक ४३ - दापोडी, गणेशनगर, महात्मा फुलेनगर, प्रभाग क्रमांक ४४ - पिंपळेगुरव, काशिदनगर, मोरया पार्क, प्रभाग क्रमांक ४६ - जुनी सांगवी, ममतानगर, जयमालानगर, शितोळेनगर
अनुसूचित जमातीसाठी राखीव प्रभाग
प्रभाग क्रमांक ४१ - पिंपळेगुरव गावठाण, जवळकरनगर, वैदुवस्ती, प्रभाग क्रमांक ५ - चèहोली, चोविसावाडी, वडमुखवाडी, प्रभाग क्रमांक ६ - दिघी, गणेशनगर, बोपखेल
पिंपरी चिंचवड महापालिकेची प्रारूप प्रभागरचना जाहीर
Reviewed by ANN news network
on
२/०१/२०२२ १०:३४:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: