ज्ञानेश्वर महाराज मंदिर भाविकांसाठी ३४ तास रहाणार बंद

आळंदी : राज्यातील वाढते कोरोना रुग्ण आणि मंदिरांत मकर संक्रांती निमित्त महिलांंची होणारी गर्दी टाळण्यासाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर भाविकांना १३ जानेवारी रात्री ८ पासून ते १५ जानेवारी २०२२ सकाळी ६ वाजे पर्यन्त बंद राहणार आहेत. दरम्यान मंदिरातील धार्मिक कार्यक्रम मर्यादित स्वरुपात सुरू रहाणार असल्याची माहिती प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी दिली. आळंदी मंदिरात शुक्रवारी दि. १४ मकरसंक्रांत अत्यंत सध्या पद्धतीने मोजक्याच लोकांत साजरी होणार आहे. मकर संक्रांत दिनी आळंदीत महिला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. मंदिर प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी भाविकांना मंदिर दर्शनास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याची नागरिकांनी नोंद घेण्याचे आवाहन व्यवस्थापक माऊली वीर यांनी केले आहे. दरम्यान भाविकांनी यूुट्युब आणि आळंदी देवस्थानच्या फेसबुक पेजवर थेट श्रींचे दर्शन मिळणार असल्याचेही वीर यांनी सांगितले.
ज्ञानेश्वर महाराज मंदिर भाविकांसाठी ३४ तास रहाणार बंद ज्ञानेश्वर महाराज मंदिर भाविकांसाठी ३४ तास रहाणार बंद Reviewed by ANN news network on १/१२/२०२२ ११:२१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".