पिंपरी : जगताप डेअरी येथील छत्रपती संभाजी महाराज समतल विलगकाचे(ग्रेड सेपरेटर)उद्घाटन राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्ही पक्षांनी बुधवारी केले. केवळ श्रेय लाटण्यासाठी दोन्ही पक्षांनी केलेल्या स्वतंत्र कार्यक्रमांमुळे सामान्य नागरिकांची चांगलीच करमणूक झाली.
साई चौक जगताप डेअरी येथील छत्रपती संभाजी महाराज ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्याचे पालिकेतील सत्ताधारी भाजपने ठरविले होते. मात्र. तत्पूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसने शहराध्यक्ष संजोग वाघेरे आणि माजी विरोधीपक्ष नेता नाना काटे यांच्या हस्ते या ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन केले. यावेळी नगरसेवक मयूर कलाटे नगरसेविका शितल काटे, सागर कोकणे,उद्योजक शिरीष साठे, सुमित डोळस, गौरव शितोळे, उत्तम धनवटे आदी उपस्थित होते.गेल्या अनेक वर्षापासून नगरसेवक नाना काटे, शितल काटे यांच्या पाठपुराव्याने या ग्रेड सेपरेटरचे काम पूर्ण झाल्याचा दावा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आला.
त्यानंतर या ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन भाजपचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, माजी शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप, माजी खासदार अमर साबळे, उपमहापौर हिरानानी घुले, सत्तारूढ पक्ष नेते नामदेव ढाके, नगरसेवक संदीप कस्पटे, नगरसेविका आरती चौंधे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका सविता खुळे, नगरसेवक विलास मडिगेरी, भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा सौ उज्वला गावडे, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चोंधे, महापालिका अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
या ग्रेड सेपरेटरमुळे आता या ठिकाणी होणारी वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न पूर्णपणे सुटणार आहे .विशेषतः पिंपळे सौदागरहून आयटी पार्क हिंजवडीला जाणा-या नागरिकांना पूर्वी सारखी वाहतूक कोंडीची समस्या भासणार नाही त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे . महापालिका निवडणूक जवळ आल्याने विकासकामांची उद्घाटने करून आपण कार्यक्षम असल्याचे भासविण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करत आहेत.
ग्रेडसेपरेटरच्या उद्घाटनाचे श्रेय घेण्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये चढाओढ
Reviewed by ANN news network
on
१/०५/२०२२ १०:००:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: