पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका येत्या आर्थिक वर्षात कोणतीही करवाढ करणार नाही. गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत तशा प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. नागरिकांना त्यामुळे दिलासा मिळाला.
महापालिकेची जानेवारी महिन्यातील सर्वसाधारण सभा गुरुवारी झाली.
सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरिता २० फेब्रुवारी २०२२ पूर्वी करांचे दर ठरविणे आवश्यक असल्यामुळे तसा प्रस्ताव सभेसमोर होता. आयुक्तांनी आगामी आर्थिक वर्षामध्ये सामान्य कर ‘जैसे थे’ ठेवण्याच्या सादर केलेल्या प्रस्तावाला स्थायी समिती सभेनंतर सभेने मान्यता दिली.
शहरात सध्या ५ लाख ६१ हजार मालमत्तांचीआहेत.निवासी मालमत्तांसाठी १ ते १२ हजार रुपयांपर्यंत १३ टक्के, बारा हजार एक रुपया ते ३० हजारांपर्यंत १६ टक्के आणि तीस हजार आणि त्यापुढील मूल्यासाठी २४ टक्के असे सध्याचे दर आहेत. हेच दर आगामी आर्थिक वर्षात कायम ठेवण्यात आले आहेत. तसेच, साफसफाई कर, अग्निशामक कर, शिक्षण कर, वृक्ष कर, मलप्रवाह सुविधा कर, पाणीपुरवठा लाभ कर, रस्ता कर जैसे थे ठेवण्यात आले आहेत. करमणूक करातही कोणतीही वाढ नाही. निवासेतर करशुल्कही कायम ठेवण्यात आले आहे. याखेरिज, मालमत्ता उतारा, हस्तांतरण नोटीस, प्रशासकीय सेवा, थकबाकी नसल्याचा दाखला देणे यासाठी आकारण्यात येणारे शुल्क आहे तसेच राहणार आहे. यामुळे आगामी आर्थिक वर्षांत कोणतीही करवाढ होणार नाही.
पिंपरी चिंचवड : नागरिकांना दिलासा; पुढील वर्षात करवाढ नाही
Reviewed by ANN news network
on
१/२०/२०२२ १०:०५:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: