उपमुख्यंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी
पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पिंपरी चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत लक्ष घालावे अशी विनंती कष्टकरी जनता आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केली आहे.
अजित पवार यांची पुणे येथील शासकीय विश्रामगृहात कांबळे यांनी भेट घेतली आणि महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत निवेदन दिले. याबाबत कांबळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.तसेच स्थायी समितीमध्ये प्रत्येक आठवड्यामध्ये शेकडो कोटींच्या निविदा मंजूर केल्या जात आहेत. नागरिकांचे प्रश्न सोडविण्याकडे कोणाचेही लक्ष नाही. त्याबाबत सातत्याने प्रश्न लावून धरले तरी सत्ताधारी त्याकडे सकारात्मक पाहत नाहीत. ठेकेदार आणि त्यांचे हित सत्ताधारी पाहत आहेत. या सह पिंपरी चिंचवड महापालिकेतील अनेक गैरकारभाराच्या तक्रारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्या.
या तक्रारीची दखल पवार यांनी घेतली असून ते म्हणाले की, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. महानगरपालिकेमध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करू असे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचाराकडे लक्ष द्या : बाबा कांबळे
Reviewed by ANN news network
on
१/१६/२०२२ ०९:३६:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: