पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील गौतमी संजय निकम ही विद्यार्थिनी वर्धा येथील राष्ट्रभाषा प्रचार समितीने घेतलेल्या ‘राष्ट्रभाषा प्रारंभिक’ परीक्षेमध्ये देशात पहिला क्रमांक मिळविला आहे.
सन २०१९ सत्रामध्ये राष्ट्रभाषा प्रारंभिक परीक्षा राष्ट्रीयस्तरावर घेण्यात आली. या परीक्षेमध्ये गौतमी भारतामध्ये प्रथम आली आहे. त्याबद्दल तिचा नाना काटे सोशल फाऊंडेशन आणि सागर कोकणे मित्र परिवार यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. गौतमी हिला पुढील शिक्षणासाठी नाना काटे सोशल फाऊंडेशन, स्विकृत सदस्य सागर कोकणे मित्र परिवार यांच्या वतीने आर्थिक मदत देण्यात आली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सन १९३६ साली राष्ट्रभाषा प्रचार समितीची वर्धा येथे स्थापन केली आहे. राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या वतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यात येतो. या समितीच्यावतीने दरवर्षी राष्ट्रभाषा प्रारंभिक परीक्षा घेतली जाते.
राष्ट्रभाषा प्रारंभिक परीक्षेत गौतमी निकम देशात पहिली
Reviewed by ANN news network
on
१/१०/२०२२ ११:०५:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: