भोसरी : भोसरीतील लांडेवाडी शिवसेना शाखेतर्फे प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानाला पिंपरी चिंचवड शहर संघटिका ऊर्मिला काळभोर आणि पिंपरी विधानसभाप्रमुख राजेश वाबळे तसेच अॅड. दत्ताराम साळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात झाली. याप्रसंगी लांडेवाडी मधील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
अभियानाच्या दरम्यान उर्मिला काळभोर यांनी नागरिकांच्या मुलभूत सुविधांबद्दलची नोंद घेतली. आणि त्याबद्दल मार्गदर्शन ही केले. तसेच शिवसेनेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आश्वासन दिले. नागरिकांसाठी सदस्य नोंदणीचे अभियान पुढील ४ दिवस राबण्यात येणार आहे. याप्रसंगी लांडेवाडी शाखेचे शाखाप्रमुख विशाल चव्हाण, महिला आघाडीच्या दिपिका जगदाळे, प्रतिक्षा लोयरे, प्रियंका कांबळे, पुनम दुनघव, गायत्री शेंडगे, ओमकार जगदाळे, दिनेश चव्हाण, पुष्पक चव्हाण, गणेश पुट्टे, दत्ता लोंढे, बालाजी जगदाळे यांसह नागरिक उपस्थित होते.
लांडेवाडीमध्ये शिवसेना सदस्य नोंदणीला सुरुवात
Reviewed by ANN news network
on
१२/३१/२०२१ ११:०५:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: