आळंदी : आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात गुरुवारी एकादशीच्या दिवशी भाविकांनी दर्शनास गर्दी केली. हजारो भाविकांनी दर्शन घेतले. पालखीची मंदिर प्रदक्षिणा हरिनाम गजरात झाली.
मंदिरात पहाटे वेदमंत्र जयघोषात अभिषेक करण्यात आला. यावेळी आळंदी देवस्थांनचे विश्वस्त डॉ. अभय टिळक, व्यवस्थापक माऊली वीर आदि उपस्थित होते. भाविकांना श्रींचे मंदिर दर्शनास कोरोना नियमांचे पालन करून वीणामंडपातून दर्शन खुले करण्यात आले. मानकरी, सेवक यांना नारळ प्रसाद वाटप करण्यात आले.
आदमापूर संस्थानचे मानकरी कृष्णात डोणे वाघापुरे यांनी श्रींचे दर्शन घेतले. यावेळी रोहन कु-हाडे पाटील, अमित कु-हाडे, समिर घुंडरे, सौरभ गव्हाणे, प्रसन्न बोराटे, शुभम जाधव आदि उपस्थित होते.आळंदी देवस्थांचे वतीने व्यवस्थापक माऊली वीर यांनी स्वागत केले.
भागवत सप्ताहाची सांगता
येथील क-हाडकर मठातील श्रीमद भागवत सप्ताहाची सांगता हरिनाम गजरात झाली. या निमित्त भाविकांनी नगरप्रदक्षिणा केली. ह.भ.प. गणेश महाराज यांचे काल्याचे कीर्तन आणि खादगावकर ग्रामस्थांच्यावतीने महाप्रसाद झाले. तत्पूर्वी भजनीमंडळ प्रमुख वाल्मिक नरहरी फड यांच्या हस्ते ग्रंथ सांगता पूजा आणि ह.भ.प. बापूसाहेब महाराज, पंढरपूर यांची कीर्तनसेवा झाली. ह.भ.प. श्रीनिवास महाराज उखळीकर यांनी सप्ताहाचे आयोजन केले होते.
एकादशी निमित्त आळंदीत भाविकांची गर्दी
Reviewed by ANN news network
on
१२/३१/२०२१ १०:५२:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: