नववर्षाच्या पूर्वसंध्येला लोणावळा परिसरात पर्यटकांची फारशी गर्दी नाही

लोणावळा: नवर्षाच्या स्वागतासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी यंदा लोणावळा- खंडाळा परिसरात पर्यटकांची फारशी गर्दी नाही. कोरोना आणि ओमीक्रॉनचा संसर्ग वाढत असल्यामुळे पर्यटकांनी पर्यटन नगरीकडे पाठ फिरविली आहे. यामुळे लोणावळ्यातील विविध व्यावसायिकायिकासह हॉटेल व्यावसायिकांचा मोठा हिरमोड झाला. सर्व ऋतूत पर्यटनासाठी नावलौकिक असणा-या लोणावळा-खंडाळा या पर्यटन स्थळासह मावळातील विविध पर्यटनस्थळे पर्यटकांची आकर्षण ठरत आहे. या पर्यटनस्थळाना भेट देण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येतात. पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळ्यातही पर्यटकांचा ओघ कायम असतो. मागील काही वर्षापासून नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला (थर्टीफस्ट) सरत्या वर्षाला निरोप देत आणि नवीन वर्षाचे स्वागत धुमधडाक्यात करण्याची मोठी क्रेज नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. यामुळे लोणावळा खंडाळा यासारख्या पर्यटन स्थळांना नागरिक प्राधान्य देत असतात. मात्र मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे लागलेले लॉक डाऊन आणि विविध निर्बंध यामुळे नागरिक बाहेर पडण्यास कचरू लागले आहे. लोणावळ्यातील पर्यटकांची आकर्षण असलेल्या टायगर, लायन्स व राजमाची ह्या पॉइंट्सह कार्ला, भाजे लेणी, पवना, भुशी, लोणावळा, तुंगारली जलाशय परिसर आणि लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, राजमाची व कोराईगड या गड किल्ले परिरात मोठ्याप्रमाणात पर्यटकांच्या संख्येत घट झाल्याचे चित्र होते. असेच चित्र मावळातील इतर ठिकाणी होते. कोरोनाचे निर्बंध हटवल्याने पर्यटक मोठ्याप्रमाणात येतील या आशेने व्यवसायिकांनी जोरदार तयारी केली होती.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला लोणावळा परिसरात पर्यटकांची फारशी गर्दी नाही नववर्षाच्या पूर्वसंध्येला लोणावळा परिसरात पर्यटकांची फारशी गर्दी नाही Reviewed by ANN news network on १२/३१/२०२१ १०:५४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".