देहूरोड : देहूरोड येथील सेनादलाच्या गुणवत्ता नियंत्रणालयात 15 ते 19 डिसेंबर या काळात लष्करी वाहनांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. त्याचे उद्धाटन दि.15 रोजी सकाळी 10 वाजता संरक्षण मंत्री राजनाथसिंह ऑनलाईन पद्धतीने करणार आहेत.ब्रिगेडियर आर.धनखड यांनी ही माहिती दिली.
या प्रदर्शनात प्रामुख्याने लष्करात वापरल्या जाणाऱ्या मोटारी, रणगाडे, मालमोटारी नागरिकांना पहायला मिळणार आहेत. हे प्रदर्शन भारतीय बनावटीची शस्त्रास्त्रे बनविण्यासाठी खाजगी कंपन्यांना “आत्मनिर्भर भारत” आणि “मेक इन इंडिया” च्या योजने अंतर्गत प्रोत्साहन मिळावे यासाठी प्रामुख्याने भरविण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे नागरिकांना लष्करात कोणती वाहने वापरली जातात याची माहिती मिळावी यासाठी देखील हे आयोजित करण्यात आले आहे.
देहूरोड येथे लष्करी वाहनांचे प्रदर्शन
Reviewed by ANN news network
on
१२/१०/२०२१ ११:५२:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
१२/१०/२०२१ ११:५२:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: