अमोल थोरात यांच्यावर मोठी जबाबदारी : पिंपरी, चिंचवड, भोसरी विधानसभेचे समन्वयक!


पिंपरी  :  भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड संघटन सरचिटणीस तथा मुख्य प्रवक्ता अमोल थोरात यांच्यावर पक्षाने आणखी मोठी जबाबदारी दिली आहे. संघटन सरचिटणीस पदाबरोबरच पिंपरी, चिंचवड, भोसरी विधानसभेचे समन्वयक म्हणून काम पाहण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तसे नियुक्तीचे पत्र  प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.

भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने सदाशिवराव खाडे हे पिंपरी विधानसभेचे प्रभारी, विजय फुगे हे भोसरी विधानसभेचे प्रभारी तसेच संतोष गुलाबराव कलाटे हे चिंचवड विधानसभेचे प्रभारी म्हणून यापूर्वीच नियुक्त झालेले आहेत. तर अमोल थोरात हे पिंपरी-चिंचवड जिल्ह्याचे संघटन सरचिटणीस म्हणून काम पाहत आहेत.

आगामी काळात पिंपरी-चिंचवड जिल्हा संघटन सरचिटणीस पदाबरोबरच पिंपरी, चिंचवड व भोसरी या तीनही विधानसभांचा संपूर्ण व योग्य समन्वय साधण्यासाठी अमोल थोरात यांच्यावर ‘समन्वयक’ म्हणून अत्यंत महत्वाची जबाबदारी प्रदेश संघटनेने सोपविली आहे. आगामी महापालिका निवडणुका तसेच अन्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर थोरात यांची निवड करण्यात आली आहे.

संघटनात्मक कार्याची घेतली दखल

अमोल थोरात यांनी भाजपा पिंपरी चिंचवडचे सरचिटणीस, संघटन सरचिटणीस अशी महत्वाची जबाबदारी असतानाच शहरातील शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ यंत्रणा यासह संघटनात्मक बांधणीबाबत सक्रिय योगदान दिले आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी थोरात यांच्यावर मुख्य प्रवक्ता या पदाची जबाबदारी काही दिवसांपूर्वीच सोपावली होती. त्यानंतर आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी, चिंचवड आणि भोसरी अशा तीनही विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
अमोल थोरात यांच्यावर मोठी जबाबदारी : पिंपरी, चिंचवड, भोसरी विधानसभेचे समन्वयक! अमोल थोरात यांच्यावर मोठी जबाबदारी : पिंपरी, चिंचवड, भोसरी विधानसभेचे समन्वयक! Reviewed by ANN news network on १२/१०/२०२१ ११:४९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".