पिंपरी चिंचवड पालिकेतील बेशिस्त कर्मचाऱ्यांवर आयुक्तांची वक्रदृष्टी!


पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वेळेत कामावर न येणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचे आयुक्त राजेश पाटील यांनी ठरविले आहे. आयुक्तांनी याबाबतीत एक आदेश काढला आहे.

आदेशात म्हटले आहे की, कार्यालयाने नेमून दिलेल्या वेळेत नियमित उपस्थित रहावे. थम्ब, फेस लिडिंग इम्प्रेशन करून हजेरी पत्रकावर स्वाक्षरी करावी. नियंत्रित अधिकाऱ्यांनी हजेरी पत्रकाची दैनंदिन तपासणी करताना करावी. महापालिका कार्यालयात प्रवेश उपस्थित असताना ओळखपत्र दर्शनी भागावर लावावे. पदानुसार विहित केलेला गणवेश परिधान करावा. गणवेश परिधान करीत नसलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशा सूचना केल्या आहेत.

ज्या अधिकारी, कर्मचाऱ्याने एका महिन्यात ३ किंवा त्यापेक्षा जास्त वेळेस थम्ब इम्प्रेशन उशिराने केलेले असल्यास त्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची ३ लेटकरिता एक किरकोळ रजा खर्ची टाकण्याची कारवाई करावी. कार्यालयीन वेळेत कामाची जागा सोडून अधिकारी, कर्मचारी इतस्त्र फिरत असल्यास, दुपारी भोजनाच्या सुटीनंतर वेळेवर जागेवर उपस्थित राहत नसल्यास अशा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी. फिरती रजिस्टर विहित नमुन्यात ठेवून त्यामध्ये फिरतीच्या ठिकाणी, कामाचे स्वरूप, बाहेर जाण्याची वेळ व कार्यालयात आल्यानंतर परत आल्याची वेळ नियमितपणे नमूद करावी. नियंत्रित अधिकाऱ्यांनी फिरत्या रजिस्टरची वेळोवेळी तपासणी करून स्वाक्षरी करावी. तपासणी पथकाने नियमितपणे विभागांची तपासणी करावी. तपासणीमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांचे रजा खतावणी रजिस्टर प्रामुख्याने तपासावे, असे आदेशात म्हटले आहे .

पिंपरी चिंचवड पालिकेतील बेशिस्त कर्मचाऱ्यांवर आयुक्तांची वक्रदृष्टी! पिंपरी चिंचवड पालिकेतील बेशिस्त कर्मचाऱ्यांवर आयुक्तांची वक्रदृष्टी! Reviewed by ANN news network on १२/१०/२०२१ ११:५५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".