भोसरीत काँग्रेसच्या मेळाव्यास चांगला प्रतिसाद

भोेसरी : पिपंरी चिचंवड शहर जिल्हा काँग्रेस कडून आदर्शनगर भोसरी येथे रविवारी नुकतेच पी एम टी चौक ते सॅण्डविक कॅालनी परिसराजवळील आदर्शनगर पर्यंत पदयात्रा घेत काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा व उल्लेखनीय कार्य करणार्याय नागरिकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. बहुजन समाज पक्षाचे पुणे जिल्हा सचिव हरिष डोळस यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला. डोळस यांनी प्रवेशानतंर आदर्शनगर येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले. आदर्श नगर येशील मैदानात मेळावा घेण्यात आला. या मेळाव्या दरम्यान वंचित बहूजन आघाडीच्या रेखा ओव्हाळ, मनोरमा रोकडे, कोमल पाईकराव, सीमा आगम, बहूजन समाज पक्षाच्या अनिता डोळस,सविता डोळस, भीमाई बचत शीतल साळवे,सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मीबाई डोळस,संगीता जाधव, आशा जाधव व अनिता अडसुळे यांनी काँग्रेस पक्षात अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव पृथ्वीराज साठे व कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली जाहीर प्रवेश केला. या वेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या रघुनाथ डोळस, भीमराव गायकवाड, सुरेश डोळस, राघू कदम, डॉक्टर आलम, पुष्पेन्द्र नाईक, शंकर गंगावणे, मुनव्वर शहा रौफ शेख, मौलाना रहमत अली, मौलाना अब्दुल लतीफ, अरुण वाघमारे, जगन्नाथ जाधव, रफ्तार भाई शहा, अनिल जाधव, अनिल रोकडे, बालाजी पाईकराव, गौतम आगम,दिनेश पडघम, आरिफ खान, पेत्रस पारखे, प्रकाश पोपळे या नागरिकांचा स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या प्रसंगी बोलताना काँग्रेस चे राष्ट्रीय सचिव पृथ्वीराज साठे म्हणाले, आज देशापुढील आव्हाने पाहता काँग्रेस पक्षाने देशाला नेतृत्व देण्याची नितांत गरज आहे अशी भावना जनमानसात आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम म्हणाले, काँग्रेस पक्षाने भोसरी गावातूनच पहिला आमदार दिला व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत पहिले महापौरपद हि दिले व काँग्रेस पक्षानेच भोसरीचा राजकीय सन्मान वाढवला नंतर अनेकांनी पक्ष सोडला व सध्यातर भोसरी व संपूर्ण शहराची मान खाली होईल असे वर्तन भाजपाच्या पदाधिकार्‍यांनी केले. काँग्रेस पक्षाने भोसरीचा राजकीय सन्मान वाढवला, भाजपाने तो घालविला. भोसरीतील हा मेळावा परिवर्तनाची नांदी ठरणारा आहे शहरात परिवर्तन होणार हे सरळ स्पष्ट आहे. या प्रसंगी पर्यावरण विभागाचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक मोरे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, काँग्रेस सेवादलाचे शहराध्यक्ष विरेंद्र गायकवाड, एन एस यू आय चे शहराध्यक्ष डॅा.वसीम इमानदार, के एम रॅाय आदि पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
भोसरीत काँग्रेसच्या मेळाव्यास चांगला प्रतिसाद भोसरीत काँग्रेसच्या मेळाव्यास चांगला प्रतिसाद Reviewed by ANN news network on १२/२१/२०२१ १०:४१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".