पिंपरी : नव्यानेच अस्तित्वात आलेल्या देहू नगरपंचायतीच्या 13 जागांसाठी मंगळवारी मतदान शांततेत पार पडले.सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार 74.97 टक्के मतदान झाले होते.
मंगळवारी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत 26 मतदान केंद्रांवर मतदान झालेे. यामध्ये 5 हजार 649 पुरुष मतदारांनी आणि, 5 हजार 168 स्त्री मतदारांनी अशा एकूण 10 हजार 817 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. इतर एक असे 17 हजार 957 मतदार मतदानाचा हक्क बजावणार होते. तर अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
देहू नगरपंचायतींच्या 17 प्रभागासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. मात्र, ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने प्रभाग 11,12, 14 आणि 15 मधील निवडणूकही स्थगित करण्यात आली. त्यामुळे 13 जागांसाठी मतदान झाले आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर 5 असे 130 कर्मचारी व प्रत्येकी एक पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी 3 पोलीस निरीक्षक, 14 पोलीस उपनिरीक्षक व सहायक पोलीस निरीक्षक आणि 73 पोलीस कर्मचार्यांिची नियुक्ती करण्यात आली होती. 13 प्रभागातून 48 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये राष्ट्रवादी कॉग्रेसचे 13, भाजपा 13, शिवसेना 8, तर काँग्रेसचे 5 उमेदवार असून 9 अपक्ष उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांआनी बजावला मतदानाचा हक्क
देहू नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यां नी मतदानाचा हक्क बजावला. सर्व निवडणूक केंद्रांना विठ्ठलराव शिंदे, दिलीप ढोरे, प्रविण झेंडे, शहराध्यक्ष प्रकाश हगवणे, कांतिलाल काळोखे, योगेश जाधव, विशाल परदेशी, सागर गायकवाड, सोमनाथ चव्हाण, चंद्रकांत भोसले यांनी भेटी दिल्या.
देहू नगरपंचायतीसाठी 74.97 टक्के मतदान
Reviewed by ANN news network
on
१२/२१/२०२१ १०:४४:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: