पिंपरी : सुदुंबरे येथील एनडीआरएफच्या पाचव्या पथक छावणीचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन झाले. शहा यांनी नवीन छावणीची पाहणी करून माहिती घेतली. यावेळी त्यांनी जवानांसोबत भोजनही केले.
जवानांशी संवाद साधणे, त्यांच्या देशसेवेच्या विलक्षण भावनेच्या जवळ जाणे आणि त्यांच्यासोबत आनंददायी वेळ घालवणे हे मनाला खूप आनंद आणि अभिमान देते. अशी प्रतिक्रिया अमित शहा यांनी यावेळी दिली.
शहा म्हणाले, मोदी सरकार ’एनडीआरएफ’ला अधिक कार्यक्षम करण्यासह उत्तम संसाधन उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध आहे. एसडीआरएफ’ला एनडीआरएफच्या बरोबरीचे बनवण्याची वेळ आली आहे. एवढ्या मोठ्या देशात आपत्तीच्या वेळी जनतेला वाचवण्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफ यांच्या एकत्रित प्रशिक्षणावर आणि सरावावर आपण भर दिला पाहिजे.’
‘लोकांचे प्राण वाचवण्यासाठी एनडीआरएफ जवानांची तत्परता आणि समर्पण यामुळे लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. एनडीआरएफने आपल्या कर्तव्यदक्षतेने देशातच नव्हे तर परदेशातही जो विश्वास कमावला आहे, त्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे.
सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी इतर देशांत जाऊन देखील लोकांचे प्राण वाचवण्यासाठी ते काम करतात. ही परंपरा आपल्याला पुढे चालू ठेवायची आहे.’ असे अमित शहा म्हणाले.
गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते एनडीआरएफच्या नव्या छावणीचे उद्घाटन
Reviewed by ANN news network
on
१२/१९/२०२१ १०:०७:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: