तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या सार्वात्रिक निवडणुकीच्या घोषणकडे सर्वांचे डोळे लागले असून शहरातील प्रभाग रचनेबाबत कमालीची उत्सुकता सर्वच राजकीय पक्ष आणि विविध पक्षातील इच्छुकांना लागली आहे. तर सध्या फक्त अंदाज बांधणीच्या चर्चा जागोजागी सुरू आहेत.
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची मागील निवडणूक 14 डिसेंबर 2016 रोजी झाली होती. त्यावेळी नगर परिषदेचे 13 प्रभाग आणि 26 उमेदवार निश्चित होते. यावेळी मात्र वाढलेल्या लोकसंख्येमुळे 14 प्रभाग आणि 28 उमेदवार निवडणूक आयोगाने निश्चित केलेले आहेत. तर यावेळी व्दिसदस्य प्रभाग पद्धतीने निवडणूक होणार आहे.
सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या नियोजनाची जोरदार तयारी चालवलेली असून 14 प्रभागात कोणते उमेदवार इच्छुक आहेत. याचा अंदाज घेतला जात आहे.तर एखाद्या उमेदवाराला पक्षाने दिलेल्या उमेदवारीबाबत मतदारांचे त्याविषयीचे मत काय आहे याचा कानोसा घेतला जात आहे.त्या प्रभागात त्या उमेदवाराचे असलेले सामाजिक,राजकीय, सांस्कृतिक कार्य इत्यादी बाबत गुप्तपणे माहिती घेण्याचे काम वरिष्ठ नेते करत आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत महिलांना 50 टक्के आरक्षण असल्याने चौदा प्रभागात महिलांना संधी नियमानुसार मिळू शकते तर इतर आरक्षणाबाबत सर्वांना संभ्रमच आहे
सध्या निवडणुकीचे वेध सर्वच इच्छुक उमेदवारांना लागलेले असून काही उमेदवारांनी जनसंपर्क मोहीमेवर भर दिलेला आहे. आपल्या विभागातील मतदारांच्या भेटीगाठी तसेच अन्य माध्यमातून आपला संपर्क वाढविला जात आहे.
नगर परिषद प्रशासनाने प्रभाग रचनेचा आरखडा निवडणूक आयोगाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवला असून आपला प्रभाग, त्याची रचना, त्याचे आरक्षण याबाबत प्रत्येक इच्छुकास प्रचंड उत्सुकता लागलेली आहे. प्रभाग रचना जाहीर होण्याची सर्वजण वाट पाहत आहेत.
सध्या प्रभाग रचनेबाबत इच्छुक उमेदवार व कार्यकर्ते आपले वेगवेगळे आडाखे बांधत आहेत. त्यांच्या चर्चेमधून रस्त्याच्या पलीकडचा भाग या प्रभागात जोडला आहे, या बोळीतून हा प्रभाग तोडला आहे, हा प्रभाग या पक्षाला सुरक्षित आहे, दुसरा प्रभाग त्या उमेदवाराला निवडणुकीसाठी योग्य राहील, एका प्रभागांमध्ये जास्तीत जास्त चार हजार पर्यंत मतदारांची संख्या असेल, तसेच सहा जानेवारीपर्यंत या सदस्यांचा कार्यकाल राहणार असून पुढे प्रशासकीय राजवट येते, की याच सदस्यांना मुदतवाढ मिळते, किंवा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होते. अशा प्रकारच्या चर्चेमधून अनेक वावड्या उठून तासनतास इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यामध्ये चर्चेला उधाण येत आहे.
तळेगावातील राजकीय वर्तुळात प्रभागरचनेबद्दल कमालीची उत्सुकता
Reviewed by ANN news network
on
१२/१९/२०२१ १०:११:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: