लोणावळा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे कर्नाटक मध्ये अवमान करण्यात आला तसेच यावर बोलताना तेथील मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी हि घटना छोटी असुन हिला कमी महत्त्व देतात असे वादग्रस्त वक्तव्य करून मराठी माणसाच्या तसेच शिवसैनिकांच्या , शिवभक्तांच्या जखमेवर मीठ चोळन्याचे काम केल्याचा आरोप करीत लोणावळा शहर शिवसेनेच्या वतीनं सदर घटनेचा आणि कर्नाटक मुख्यमंत्र्यांचा निषेध करण्यात आला.
वरील घटनेचा निषेध म्हणून शिवसेना लोणावळा शहरच्या वतीने लोणावळ्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख शिवसेना प्रवक्ते सचिन आहिर यांच्या हस्ते दुग्ध अभीषेक घालुन तेथील चौकात निषेध सभा घेण्यात आली करण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन शहर प्रमुख बाळासाहेब फाटक यांनी केले तर कर्यक्रमाचे प्रस्ताविक युवासेना अधीकारी मावळ विधानसभा शाम सुतार यांनी केले. यावेळी शिवसेना पुणे उपजिल्हा प्रमुख शरद हुलावळे, नगरपालिका विरोधी पक्षनेत्या शादान चौधरी, हेमंत मेणे, सचिव गिरी गोसावी, नरेश काळवीट, माजी नगराध्यक्ष राजू गवळी, संगिता कंधारे, जयवंत दळवी, नगरसेवक शिवदास पिल्ले, नगरसेवीका सिंधुताई परदेशी आदींसह पदाधिकारी व शिवसैनिक बहुसंखेने उपस्थित होते.
लोणावळ्यात शिवरायांच्या पुतळ्याला शिवसेनेने घातला दुग्धाभिषेक
Reviewed by ANN news network
on
१२/१९/२०२१ १०:०४:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: