पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात 2006 सालापासून मानधन तत्वावर नोकरी करणाऱ्या परिचारिका आणि निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांनी आपणाला महापालिकेच्या सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे या मागणीसाठी सोमवारी महापौर माई ढोरे आणि आयुक्त राजेश पाटील यांच्यासह महापालिकेतील सर्व पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.
भेटीच्यावेळी या कर्मचाऱ्यांनी पदाधिकारी आणि आयुक्तांना निवेदन दिले असून आपणास कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्यावे अशी विनंती त्यांना केली आहे. एकीकडे वायसीएम रुग्णालयात गेली पंधरा वीस वर्षे मानधन तत्वावर काम करणारे कर्मचारी असताना दुसरीकडे महापालिका प्रशासनाने परिचारिका व तत्सम पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. जाहिरातीद्वारे भरल्या जाणाऱ्या पदांवर मानधन तत्त्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्राधान्याने नोकरीत सामावून घ्यावे अशी या कर्मचाऱ्यांची मागणी आहे.
महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयांमध्ये मानधन तत्वावर 102 परिचारिका व निमवैद्यकीय कर्मचारी काम करत आहेत. 2006 सालापासून हे कर्मचारी काम करत असून अद्यापही त्यांना कायम नोकरीत सामावून घेण्यात आलेले नाही. आपणाला कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्यावे अशी या कर्मचाऱ्यांची मागणी आहे.
कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्या! वायसीएम रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची मागणी
Reviewed by ANN news network
on
१२/१३/२०२१ ०४:३४:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
१२/१३/२०२१ ०४:३४:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: