पिंपरी : सोलापूर येथे झालेल्या चौथ्या खेलो इंडिया कबड्डी स्पर्धेत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संघाने अंतीम विजेतेपद पटकावले.
शुक्रवारी कुमठा नाका ,सोलापूर येथील जिल्हा क्रीडा संकुलातील इनडोअर हॉलमध्ये ही स्पर्धा झाली. महापालिकेच्या कबड्डी संघाने पुणे विभागाचे प्रतिनिधित्व करीत नेवासा येथील दादासाहेब हरिभाऊ घाडगे संघावर वर २५ -१७ अशी ८ गुणांनी मात करत सामना जिंकला.
महापालिका संघाच्या भूमिका गोरे, मनीषा राठोड ,पूजा तेलंग यांनी उत्कृष्ट चढाया तर सिफा वस्ताद, कोमल राठोड ,सविता गवई, रूपाली डोंगरे यांनी उत्कृष्ट पकडी केल्या.संघातील प्रतीक्षा लांडगे, तेजल महाजन, विद्या गायकवाड ,निकिता माळी, सखुबाई जाधव यांच्या सांघिक प्रयत्नाने संघाचा विजय सुकर झाला.
संघाचा सत्कार सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त धनराज पांडे, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, जिल्हा कबड्डी संघटनेचे सचिव मदन पाटील, राज्य क्रीडा मार्गदर्शक सत्येन जाधव, ज्ञानेश्वर खुरंगे यांच्या हस्ते करण्यात आला.
हा महापालिकेचा कबड्डी संघ दिनांक १५ व १६ डिसेंबर रोजी बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात होणाèया राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेस पात्र झाला आहे.
विजयी संघाचे पालिकेच्या सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे, क्रीडा सभापती उत्तम केंदळे, क्रीडा अधिकारी अनिता केदारी यांनी कौतुक करत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
संघाला गोपीचंद करंडे कालिदास लांडगे यांचे सहकार्य लाभले. बी.जी. आटवे यांनी मार्गदर्शन केले. संघाचे व्यवस्थापन सोनाली जाधव यांनी केले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कबड्डी संघाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
Reviewed by ANN news network
on
१२/०५/२०२१ १०:५१:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: