आमदार लक्ष्मण जगताप यांची एसटी कर्मचा-यांच्या आंदोलनाला दुस-यांदा भेट

पिंपरी : एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी पिंपरी चिंचवडमधील वल्लभनगर आगारातील एसटी कर्मचा-यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला आमदार लक्ष्मण जगताप यांनी रविवारी दुस-यांदा भेट दिली. या कर्मचा-यांशी त्यांनी संवाद साधला. त्यांनी आंदोलनाची स्थिती आणि येणाèया अडचणी जाणून घेतल्या. आंदोलन सुरू असेपर्यंत सर्व आंदोलक कर्मचा-यांना जेवण पुरवण्याची जबाबदारी आपली जबाबदारी म्हणून आमदार जगताप यांनी स्वीकारली. तसेच अन्य कोणतीही अडचण आल्यास मदत करण्याचे आश्वासन दिले. एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी संपूर्ण राज्यात एक महिन्यांहून अधिक काळ झाले एसटी कर्मचा-यांचे आंदोलन सुरू आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये वल्लभनगर येथे एसटीचे स्थानक व डेपो आहे. येथील १९० हून अधिक कर्मचारीही राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी आहेत. एसटी स्थानकाच्या बाहेर छोटा मंडप टाकून हे कर्मचारी शांततेने आंदोलन करत आहेत. परंतु, आता प्रशासनाने कर्मचा-यांना हा मंडप हटवण्यास भाग पाडून एसटी स्थानकाच्या २०० मीटर परिसराबाहेर आंदोलन करण्यास सांगितले आहे. त्यानुसार एसटी कर्मचा-यांनी स्थानकापासून २०० मीटर परिसराबाहेर पुन्हा जोमाने आंदोलन सुरू ठेवले आहे. ही बाब समजताच आमदार लक्ष्मण जगताप यांनी रविवारी नव्या जागेतील आंदोलनस्थळाला भेट दिली. त्यांनी दुस-यांदा एसटी कर्मचा-यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी येऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी नगरसेविका उषा मुंढे, प्रभाग स्वीकृत सदस्य महेश जगताप, भाजपचे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी संतोष कलाटे आदी उपस्थित होते. आंदोलनाच्या सद्यःस्थितीबाबत माहिती घेतली. विलीनीकरण नाही, तर आंदोलन मागे नाही ही भूमिका कायम असल्याचे एसटी कर्मचा-यांनी स्पष्ट केले. आपल्या न्याय्य हक्कासाठी लढणाèया एसटी कर्मचा-यांसोबत आपण असल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले. आमदार जगताप यांनी आंदोलन करताना एसटी कर्मचा-यांना कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे, याचीही माहिती घेतली. सर्व अडचणींवर मात करून एसटी कर्मचारी आंदोलन यशस्वी करतील, असा विश्वास आणि धीर आमदार जगताप यांनी दिली. तसेच आंदोलनात सहभागी सर्व एसटी कर्मचाèयांना आंदोलन सुरू असेपर्यंत जेवण पुरवण्याची हमी त्यांनी दिली. आपली जबाबदारी समजून त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली. तसेच कर्मचाèयांना अन्य कोणतीही अडचण आल्यास मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
आमदार लक्ष्मण जगताप यांची एसटी कर्मचा-यांच्या आंदोलनाला दुस-यांदा भेट आमदार लक्ष्मण जगताप यांची एसटी कर्मचा-यांच्या आंदोलनाला दुस-यांदा भेट Reviewed by ANN news network on १२/०५/२०२१ १०:४८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".