इच्छुक उमेदवारांना तयारीला मिळाले कट्ट्याचे व्यासपीठ ! लोकजनशक्ती पार्टीचा उपक्रम

पुणे :राजकीय वातावरणात द्वेषाचे वातावरण वाढत असले तरी संस्कृतीत कौटुंबिक जिव्हाळा हवा, पती - पत्नी जोड्या राजकारणात असतात तेव्हा जिव्हाळ्याचे वातावरण टिकण्यास मदत होते, असा सूर लोकजनशक्ती पार्टी आयोजित ' पुणे मनपा निवडणूक इच्छुक 'कट्टयावर उमटला ! राजकीय जीवनात ४ दशके वावरणाऱ्या गोपाळ चिंतल, सुनीता चिंतल या दांपत्याचा सत्कार करण्यात आला. योगायोगाने चिंतल दांपत्याचा आज लग्नाचा वाढदिवस होता. लोकजनशक्ती पार्टी आयोजित हा ' पुणे मनपा निवडणूक इच्छुक कट्टा ' ' शनीवार १८ डिसेंबर, सकाळी १० वाजता हॉटेल अण्णा इडली, मार्केट यार्ड गेट येथे उत्साहात पार पडला. ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार ( काँग्रेस ), नगरसेवक गोपाळ चिंतल, भाजपा पुणे महिला आघाडी अध्यक्ष सौ.सुनीता चिंतल( भाजपा ), बाळासाहेब मालुसरे ( शिवसेना,मंडई विद्यापीठ कट्टा ), नाथाभाऊ शेवाळे ( प्रदेशाध्यक्ष, जनता दल सेक्युलर ) हे मान्यवर सहभागी झाले. लोकजनशक्ती पार्टी पुणे शहर-जिल्हा अध्यक्ष संजय आल्हाट,उपक्रमाचे समन्वयक डॉ.दीपक बीडकर यांनी स्वागत केले. उल्हास दादा पवार यांनी सार्वजनिक जीवन गढूळ होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली. पुण्याच्या राजकीय जीवनाचा आढावा घेतला. प्रबोधनकार ठाकरे यांच्यामुळे भोकरवाडी ला राजेवाडी नाव मिळाल्याचा प्रसंगाला उजाळा दिला. तसेच फक्त पोस्टकार्डावरील निमंत्रणावरून तत्कालिन केंद्रीय मंत्री यशवंतराव चव्हाण नाना पेठेतील घरी भोजनासाठी आल्याचा अनुभव सांगीतला. जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी त्यांच्या रांजणगाव जवळच्या हॉटेलच्या उद्धाटनाला तत्कालिन पंतप्रधान देवेगौडा प्रतिकुल परिस्थितीत विशेष विमानाने आल्याचा किस्सा सांगितला. प्रामाणिकपणाचे हे फळ असल्याचे सांगीतले. निहाल अहमद यांच्या वाहन न वापरता चालत पालिकेत गेल्याने तासभर रोज शेकडोंचा जनसंपर्क होतो, अशा आठवणीला उजाळा दिला. नगरसेवक गोपाळ चिंतल म्हणाले, ' तत्वाला मुरड न घालता राजकीय जीवनात काम करता येते. विचार सकारात्मक ठेऊन राजकीय जीवनात कार्यरत राहीले, प्रामाणिक राहिले की झोपही शांत लागते. एका मिनिटात झोप लागते, एका मिनिटात जाग येते. 'सार्वजनिक जीवनातील, राजकीय जीवनातील संवाद हरवू न देता पुण्याची सर्वसमावेशक संस्कृती पुढे नेली जावी.कट्टा संस्कृती,कट्टा उपक्रम हे त्यासाठी उपयुक्त ठरतील', असे मत सुनिता चिंतल यांनी व्यक्त केले. उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे हे चिंतल कुटुंबाच्या लहानशा खोलीत भोजनासाठी आल्याच्या प्रसंगाला उजाळा दिला. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या समंजस, सुसंस्कृत , सर्वसमावेशक संस्कृतीला पुढे नेण्यासाठी रामविलास पासवान प्रणित लोकजनशक्ती पार्टी यांच्या वतीने सर्वपक्षीय, सर्व कार्यकर्त्यांना खुले असणारे विचारांचे आदान-प्रदान करणारे कट्टा व्यासपीठ तयार करण्यात आले असून या व्यासपीठाला 'पुणे मनपा निवडणूक इच्छूक कट्टा' असे नाव देण्यात आले आहे. उपस्थितांनी इडली सांबार, चहाचा आस्वाद घेतला.नवोदितांना सूचना,जुन्यांचे राजकीय आणि कट्टा संस्कृतीचे किस्से ,एकमेकांना दिल्या -घेतलेल्या कोपरखळ्या आणि परस्परांच्या कट्ट्यावर येण्याचे निमंत्रण यामुळे कट्ट्याला रंगत आली ! राजकीय , सार्वजनिक जीवनातील किस्से पुस्तक रुपाने लिहिण्याचा आग्रह उल्हास दादांना गोपाळ चिंतल यांनी केला. बाळासाहेब मालुसरे यांनी मागील मनपा निवडणुकीत इव्हीएम मशीनच्या मुळे पराभूत झाल्याची खंत व्यक्त केली. आगामी महापालिका निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी इच्छूक उमेदवारांना मार्गदर्शन व्हावे,निवडणूक तयारीबद्दल आदानप्रदान करता यावे,सर्वपक्षीय विचारांची देवाणघेवाण व्हावी,शहरातील वातावरण द्वेषमुक्त राहावे.याकरिता हा कट्टा सुरू करण्यात आला आहे.एकेकाळी 'मंडई' हाच सामाजिक-राजकिय कार्यकर्त्याचा कट्टा हा वैचारिक आदान प्रदानाचा ठिय्या होता, आता विस्तारित पुण्याचा 'मार्केट यार्ड कट्टा'हादेखील ठिय्या व्हावा,असा मनोदय आहे,असे संजय आल्हाट यांनी सांगितले. लोकजनशक्ती पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अमर पुणेकर, बुध्दभुषण निकम, सचिन अहिरे, आदिनाथ भाकरे, संतोष वायदंडे, निखील मुनोत, शुभम आल्हाट, राहुल कुलकर्णी, हे कार्यकर्ते उपस्थित होते.
इच्छुक उमेदवारांना तयारीला मिळाले कट्ट्याचे व्यासपीठ ! लोकजनशक्ती पार्टीचा उपक्रम इच्छुक उमेदवारांना तयारीला मिळाले कट्ट्याचे व्यासपीठ ! लोकजनशक्ती पार्टीचा उपक्रम Reviewed by ANN news network on १२/१८/२०२१ ०९:०१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".