पिंपरी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुढील वर्षी होणा-या सार्वत्रिक निवडणूका काँग्रेस आत्मविश्वासाने लढणार आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा खा. सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या विविध समाज उपयोगी कार्यक्रमाव्दारे नागरीकांशी संवाद साधण्यात येत आहे. तसेच चांद्यापासून बांध्यापर्यंत काँग्रेसची महिला संघटना बांधण्याचे काम सक्षमपणे सुरु आहे. त्याअंतर्गत शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी मुलाखती घेण्याच्या कार्यक्रमास मिळालेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद विशेष उल्लेखनिय आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी केले.
शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने गुरुवारी पिंपरी येथील सावित्रीबाई फुले सभागृहात पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षपदासाठी इच्छुक असणाèया महिलांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शहर काँग्रेस शहराध्यक्ष कैलास कदम, नवी मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्षा उज्वला सावळे, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस संगिता तिवारी, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे, माजी नगरसेविका निर्मला कदम तसेच प्रा. शैलजा सांगळे, भारती घाग आदी उपस्थित होते. यावेळी संध्या सव्वालाखे आणि संगिता तिवारी यांनी महिला शहराध्यक्षपदासाठी इच्छुक असणाèया महिलांच्या मुलाखती घेतल्या.
यामध्ये नंदा तुळसे, छाया देसले, सायली नढे, अनिता अधिकारी, सुप्रिया मलशेट्टी, सुप्रिया पोहरे, स्वाती शिंदे, शोभा पगारे, कमला श्रोत्री, शितल कोतवाल, तुलसी नांगरे, शिवानी भाट, प्रतिभा कांबळे यांनी मुलाखती दिल्या. यामध्ये वकील, सामाजिक संस्थाच्या प्रतिनिधी, राजकीय क्षेत्रात व असंघटीत क्षेत्रात काम करणा-या महिलांचा समावेश होता. इच्छुक महिलांच्या वैयक्तिक मुलाखती घेऊन प्रश्न विचारले आणि त्यांची संध्या सव्वालाखे व संगिता तिवारी यांनी मते जाणून घेतली.
पिंपरी चिंचवड महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी १३ महिलांच्या मुलाखती
Reviewed by ANN news network
on
१२/१८/२०२१ ०८:४७:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: