कर्नाटकातील शिवपुतळा विटंबनेच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन

पिंपरी : कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर शाई फेकून केलेल्या विटंबनेच्या निषेधार्थ तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ काळेवाडी रहाटणी शिवसेना विभागाच्या वतीने जाहीर निषेध आंदोलन रविवारी करण्यात आले. या आंदोलनात पिंपरी चिंचवड सहसंपर्कप्रमुख वैभव थोरात, शहरप्रमुख अ‍ॅड. सचिन भोसले, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष दस्तगीर मणियार शिवसेना उपशहरप्रमुख हरेश नखाते, चिंचवड युवा अधिकारी माऊली जगताप, सुधाकर नलावडे, चिंचवड महिला आघाडीप्रमुख शारदा वाघमोडे रहाटणी विभागप्रमुख शिल्पा आनपन, भाग्यश्री म्हस्के,सविता सोनवणे अमृता सुपेकर, करुणा माने,तसलीम शेख, विभागप्रमुख गोरख पाटील,रहाटणी श्रीनगर विभागप्रमुख प्रदिप दळवी ,अंकुश कोळेकर , अरुण हमुनाबाद , हनुमंत पिसाळ, शाखाप्रमुख नरसिंग माने, प्रहारचे संजय गायके, सावता महापुरे, रविकिरण घटकार,सागर शिंदे,कानिफनाथ तोडकर, दत्ता गिरी उपविभाग प्रमुख अनिल पालांडे आदी उपस्थित होते. यावेळी सहसंपर्कप्रमुख वैभव थोरात यांनी आपल्या भाषणात कर्नाटक सरकारचा तीव्र निषेध करून छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना करणार्‍या समाज कंटकाला शिक्षा होत नाही, तोपर्यंत हा लढा शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्रभर असाच चालू राहिल असे मत व्यक्त केले.
कर्नाटकातील शिवपुतळा विटंबनेच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन कर्नाटकातील शिवपुतळा विटंबनेच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन Reviewed by ANN news network on १२/१९/२०२१ ०९:५९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".