भोळे-सुमंत स्मृती पुरस्कार जाहीर

 डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर,अतुल देऊळगावकर,डॉ.गजानन अपिने मानकरी दत्ता देसाई यांना जीवनगौरव  पुरस्कार
डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर
अतुल देऊळगावकर
दत्ता देसाई
डॉ. गजानन अपिने
पुणे : वर्धा येथील यशवंतराव दाते स्मृती संस्थेच्या वतीने ज्येष्ठ विचारवंत डॉ. भा.ल.भोळे व डॉ. यशवंत सुमंत यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर(सातारा ) , अतुल देऊळगावकर( लातूर ) व डॉ . गजानन अपिने( पुणे ) यांची निवड करण्यात आली व जीवनगौरव  पुरस्कारासाठी ज्येष्ठ कार्यकर्ते दत्ता देसाई(पुणे) यांची घोषणा करण्यात येत आहे, अशी माहिती निवड समितीचे प्रमुख निमंत्रक ज्येष्ठ अभ्यासक किशोर बेडकिहाळ व दाते संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दाते यांनी दिली.

     या पुरस्काराचे वितरण पुणे येथे २६  डिसेंबर रोजी ज्येष्ठ साहित्यक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, डाँ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजीकुलगुरु डाँ.नागनाथ कोतापल्ले यांच्या हस्ते होणार आहे.

      डॉ. यशवंत सुमंत कुटुंबियांच्या वतीने तीन वर्षापासून ज्येष्ठ अभ्यासकासाठी जीवनगौरव पुरस्कार सुरु केला आहे. यावर्षीच्या तिसऱ्या पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभ्यासक ,लेखक व लोकविज्ञान चळवळीचे कार्यकर्ते दत्ता देसाई (पुणे )  यांची निवड करण्यात आली आहे. 
 
       यशवंतराव दाते स्मृती संस्था व डॉ. भा. ल . भोळे कुटुंबीय यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणार्‍या भोळे स्मृती वैचारिक साहित्य पुरस्कारासाठी ज्येष्ठ विचारवंत ,शास्त्रज्ञ ,लेखक डाँ.दत्तप्रसाद दाभोळकर यांची  'स्वामी विवेकानंदांची खरी ओळख '  या ग्रंथासाठी निवड करण्यात आली आहे.
 
     भोळे कुटुंबीय व दाते संस्थेच्या वतीने  संयुक्त पणे देण्यात येणाऱ्या डॉ .भा.ल .भोळे स्मृती सामाजिक कार्यकर्ता पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभ्यासक,लेखक पर्यावरणवादी  कार्यकर्ते  अतुल देऊळगावकर (लातूर)यांची निवड करण्यात आली आहे.
 
     डॉ . यशवंत सुमंत स्मृती युवा संशोधन प्रेरणा पुरस्कारासाठी समीक्षक ,तरुण व्यासंगी अभ्यासक डॉ.गजानन अपिने (पुणे) यांची निवड करण्यात आली आहे .
      वरील  पुरस्काराचे स्वरूप  डॉ.भा.ल. भोळे स्मृती पुरस्कार प्रत्येकी वीस हजार व डॉ.यशवंत सुमंत स्मृती पुरस्कार प्रत्येकी
 दहा हजार रुपये रोख , स्मृतिचिन्ह, शाल व मानपत्र असे आहे.

    गेल्यावर्षी डाँ.राजा दीक्षित (पुणे),सुरेश सावंत (मुंबई ),डाँ.चिन्मय धारुरकर (केरळ)  आणि डाँ.सु.श्री.पांढरीपांडे (नागपूर ) आदी मान्यवरांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. कोरोना निर्बंधामुळे ते प्रदान करण्यात आले नव्हते. त्यांचही वितरण पुणे येथे २६ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजता  एस. एम.जोशी सोशालिस्ट फौंडेशन सभागृहात होणाऱ्या   समारंभात करण्यात येईल असे दाते स्मृती संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दाते यांनी सांगितले.
 
        पुरस्कार निवड समितीमध्ये प्रदीप दाते, डॉ. राजेंद्र मुंढे ,प्रा. हाशम शेख (वर्धा ), डॉ . अशोक चौसाळकर ( कोल्हापूर ), डाँ.चैत्रा रेडकर, विजयाताई भोळे,हिरण्यमय भोळे ,माधुरी सुमंत( पुणे ) व किशोर बेडकिहाळ ( सातारा ) आदी मान्यवरांनी काम केले अशी माहिती दाते स्मृती संस्थेचे  संजय इंगळे -तिगावकर व डॉ. राजेंद्र मुंढे यांनी दिली.माधुरी सुमंत , विजयाताई भोळे  व दाते स्मृती संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दाते यांचे योगदानाद्वारे गेले अनेक वर्षांपासून हा उपक्रम महाराष्ट्रातील वैचारिक, साहित्यक  सामाजिक  व सांस्कृतिक क्षेत्रात रावबिण्यात येत आहे .
भोळे-सुमंत स्मृती पुरस्कार जाहीर भोळे-सुमंत स्मृती पुरस्कार जाहीर Reviewed by ANN news network on १२/०२/२०२१ ०२:००:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".